Aurangabad | औरंगाबादेत 12 लाखांचा गुटखा जप्त, मुकुंदवाडीत पोलिसांची मोठी कारवाई, तिघे ताब्यात

शहरात (Aurangabad city) चोरट्या मार्गाने गुटखा, प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा करून ठेवल्याची गुप्ता माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलीसांनी छापा टाकून सदर माल जप्त केला. तसेच हा गुटखा ज्या कारमध्ये टाकला जात होता, ती कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

Aurangabad | औरंगाबादेत 12 लाखांचा गुटखा जप्त, मुकुंदवाडीत पोलिसांची मोठी कारवाई, तिघे ताब्यात
औरंगाबाद येथे गुटखा पुरवठादारांवर कारवाई
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 12:04 PM

औरंगाबाद | शहरातील किरकोळ विक्रेत्यांना ठोक दराने गुटखा विक्री (Gutkha selling) करण्यासाठी मागवण्यात आलेला 12 लाख 37 हजारांचा गुटख्याचा साठा औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) जप्त केला. गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून मुकुंदवाडी येथील इंदिरानगरात या प्रकरणी छापेमारी करण्यात आली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून शेख हबीब शेख मदन आणि शेख यासीन शेख फत्तू आणि मोहसीन मुमताज खान अशी गुटखा विक्रेत्यांची नावं आहेत. शहरात (Aurangabad city) चोरट्या मार्गाने गुटखा, प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा करून ठेवल्याची गुप्ता माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलीसांनी छापा टाकून सदर माल जप्त केला. तसेच हा गुटखा ज्या कारमध्ये टाकला जात होता, ती कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हा पुरवठा करणाऱ्या जालना येथील पुरवठादाराचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

इंदिरानगरात पोलिसांचे छापे

शहरात छुप्या मार्गाने लाखो रुपये किंमतीचा गुटखा आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त अपर्णा गीते, सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी मुकुंदवाडी येथील शेख हबीबच्या घरावर छापा टाकला. पोलिस आले तेव्हा आरोपी गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाल्याच्या गोण्या कारमध्ये भरत होता. तसेच एका खोलीत गुटख्याच्या इतर गोण्यांचा ढिगाराही होता. पोलिसांनी हा साठा आणि नऊ लाखांची कार जप्त केली. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत हबीब आणि इतर दोन साथीदारांना अटक केली. हबीब किराणा दुकान चालवत असून त्याने काही महिन्यांपासून चोरट्या मार्गाने गुटखा विक्री सुरु केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जालन्यातील पुरवठादाराविरोधात गुन्हा

दरम्यान, मुकुंदवाडी येथे पकडलेल्या तीन आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली. या आरोपींना जालना येथील अशफाक तांबोळी याने छुप्या मार्गाने गुटख्याचा साठा पुरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. चौकशीतूनही हेच समोर आले. त्यांनी तांबोळी याच्याकडूनच हा माल घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी तांबोळीविरोधातही गुन्हा नोंदवला असून त्याचा शोध सुरु आहे.

इतर बातम्या-

‘कोणाच्या तरी मागे मागे करा, काम मिळत राहणार’; मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

Phone under 10000: 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टॉप 7 स्मार्टफोन, लिस्टमध्ये Samsung, MI, Realme चे पर्याय

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.