Aurangabad | एकतर्फी प्रेमातून मित्राची हत्या, औरंगाबादेत आरोपीला जन्मठेप, 50 हजारांचा दंड

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगेश वायवळ याला दोषी ठरवून जन्मठेप व 50 हजारांचा दंड ही शिक्षा सुनावली.

Aurangabad | एकतर्फी प्रेमातून मित्राची हत्या, औरंगाबादेत आरोपीला जन्मठेप, 50 हजारांचा दंड
महिला पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारणारी महिला निर्दोषमुक्तImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 4:21 PM

औरंगाबाद | एकतर्फी प्रेमातून निर्माण झालेल्या वादानंतर जिवलग मित्राचा गळा दाबून खून (Murder) करणाऱ्या आरोपीला जन्मठेप (Life Imprisonment) आणि 50 हजार रुये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा दंड न भरल्यास दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षाही  ठोठावण्यात आली आहे. औरंगाबाद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायमूर्ती एस. जे. रामगडिया यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. या दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून मृताचे वडील तथा फिर्यादी यांना देण्याचे न्यायालयाच्या (Aurangabad court) आदेशात नमूद करण्यात आले आहे. मंगेश सुदाम वायवळ असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो परभणी येथील समसापूर येथील 27 वर्षीय तरूण आहे. मंगेशच्या विरोधात मृत अजय तिडके याचे वडील शत्रुघ्न तिकडे यांनी फिर्याद नोंदवली होती. अजय हा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील शहापूरचा रहिवासी होता.

काय आहे नेमके प्रकरण?

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, अजय आणि मंगेश 2017 पासून जिवलग मित्र होते. एनएसएस कँप दरम्यान अजयची एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेम बहरले.  अजयने मंगेशला ही माहिती सांगितली. दरम्यान, अजयच्या प्रेयसीवरच मंगेशचे एकतर्फी प्रेम जडले. घटनेच्या काही महिन्यांपूर्वी मंगेश पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी गेला होता. 31 मार्च 2018 रोजी मंगेश पुण्याहून शहरात आला. 3 एप्रिल 2018 रोजी तो अजयच्या खोलीत मुक्कामासाठी गेला. 4 एप्रिल 2018 रोजी भीमयंती उत्सवानिमित्त विद्यापीठात गायनाच्या कार्यक्रमासाठी अजय हा रुम पार्टनर अनिल भोजने आणि सचिन वानखेडे यांच्यासोबत गेला. मंगेश अजयच्या रुममध्येच झोपला होता. रात्री साडेअकरा वाजता अजय आमि त्याचे मित्र रुममध्ये आले. त्यावेळी मंगेशने अजयशी खासगी बोलायचे आहे, असे सांगत सचिन आणि अनिलला दुसऱ्या खोलीत पाठवले. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मंगेशने सचिन आणि अनिलला उठवून प्रेमात अडसर ठरत असल्याने आपण अजयचा गेम केल्याचे सांगितले. तसेच आपण पोलीस ठाण्यात जात असल्याचे सांगून तिथून निघून गेला.

रुमपार्टनर व डॉक्टरांचा जबाब महत्त्वाचा

दरम्यान, या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी लोकभियोक्त अजित अंकुश यांनी नऊ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात मृताच्या रुमपार्टनरसह डॉक्टरांचा जबाब महत्त्वाचा ठरला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने मंगेश वायवळ याला दोषी ठरवून जन्मठेप व 50 हजारांचा दंड ही शिक्षा सुनावली.

इतर बातम्या-

Vadodara: गुजराती ड्रामा अर्टिस्ट प्राची मौर्य हत्या प्रकरणी बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा

Video : कालचा हल्ला हा संजय राऊतांनीच नियोजनबद्ध केलाय का?-प्रवीण दरेकर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.