Aurangabad | लग्नानंतर फिरायला गेली अन् दागिन्यांसह पसार झाली, औरंगाबादेत नवरदेवाची फसवणूक

तुम्ही किल्ल्यात जाण्यासाठी तिकिटे काढा, मी काही खाण्याचे पदार्थ आणते, असे तिने सांगितले. बराच वेळ झाला शुभांगी परत येत नसल्याने राजेश मुख्य रस्त्याकडे आला. तेथील दुकानदारांना विचारपूस केली असता ती एका बोलेरो गाडीत बसून गेल्याचे काही जणांनी सांगितले. नंतर राजेशने दौलताबाद पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

Aurangabad | लग्नानंतर फिरायला गेली अन् दागिन्यांसह पसार झाली, औरंगाबादेत नवरदेवाची फसवणूक
नुकतीच विवाहित झालेली वधू दागिन्यांसह पसार
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 1:26 PM

औरंगाबादः तीन दिवसांपूर्वी लग्न (Marriage) झाले. नवरा-बायको सासरची मंडळी खुश होती. लग्नानंतर नवरा आणि बायको फिरायला म्हणून दौलताबाद किल्ल्यावर (Daulatabad Fort) गेले. एवढ्यात मी नवऱ्याची नजर चुकवून नववधू तेथून पसार झाली. नुकतेच लग्न झालेले असल्याने सर्वच दागिने या पत्नीच्या अंगावर होते. या दागिन्यांसह तिने दौलताबाद परिसरातून कारमधून धूम ठोकली. या महिलेच्या अंगावर 70 हजार रुपये किंमतीचे दागिने होते. 29 मार्च रोजी सदर महिला पसार झाली. त्यानंतर नुकताच विविहित झालेला पती आणि सासरच्या मंडळींना प्रचंड धक्का बसला. अखेर या प्रकरणी पोलिसात (Aurangabad police) तक्रार दाखल करण्यात आली. दौलताबाद पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. हे लग्न जुळवण्यासाठी आणि लग्न पार पडेपर्यंत राजेशला मोठा खर्च करावा लागला होता.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथे राहणारा राजेश प्रकाश लाटे हा तरुण लग्नासाठी वधूच्या शोधात होता. राजेश वाळूज येथे एका कंपनीत काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याची जळगाव जिल्ह्यातील बबन म्हस्के याच्याशी ओळख झाली. या मध्यस्थाच्या ओळखीतून एक मुलगी लग्नासाठी तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर बबन म्हस्के याने त्याची ओळख अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील आशाबाई भोरे (नवरीची मावशी) यांच्याशी करून दिली. या दोघांच्या मध्यस्थीने जळगाव जिल्ह्यातील प्रभाकर शिंदे यांची मुलगी शुभांगीसोबत राजेश लाटे याचा विवाह ठरला. यासाठी त्याला मुलीच्या नातेवाईकांना 1 लाख 30 हजार रुपये द्यावे लागले. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर शुभांगीशी 26 मार्च 2022 रोजी राजेशने दौलताबाद येथील दत्तमंदिरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडले.

दौलताबाद किल्ला पहायला गेली अन् पसार झाली

दरम्यान, राजेशने शुभांगीच्या अंगावर 70 हजार रुपये किंमतीचे दागिने घातले गोते. तसेच लग्नाचा संपूर्ण खर्चही केला होता. चांगली पत्नी मिळाल्याने सासरच्या मंडळींसह राजेशदेखील आनंदी होता. 27 मार्च रोजी हे जोडपे देवदर्शन करून आले. त्यानंतर 29 मार्च रोजी सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर हे दोघे देवगिरी किल्ला पाहण्यासाठी गेले. तेथे गेल्यावर तुम्ही किल्ल्यात जाण्यासाठी तिकिटे काढा, मी काही खाण्याचे पदार्थ आणते, असे तिने सांगितले. बराच वेळ झाला शुभांगी परत येत नसल्याने राजेश मुख्य रस्त्याकडे आला. तेथील दुकानदारांना विचारपूस केली असता ती एका बोलेरो गाडीत बसून गेल्याचे काही जणांनी सांगितले. नंतर राजेशने दौलताबाद पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

इतर बातम्या-

Video : मोराने रस्त्यात पिसारा फुलवला, 20 सेकंदाच्या व्हीडिओला चार लाख लोकांची पसंती…, एकदा बघाच

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नावरील हे भन्नाट मीम्स एकदा पहाच; पोट धरून हसाल!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.