‘गुन्हा केला का? मला फासावर लटकवणार का?’, बिर्याणीच्या प्रश्नावर इम्तियाज जलील यांचे सवाल

एमआयएमच्या साखळी उपोषणादरम्यान काही कार्यकर्त्यांनी बिर्याणीवर ताव मारल्याची बातमी समोर आलेली. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ समोर आलेला. आता या प्रकरणावर इम्तियाज जलील यांनी स्पष्टीकरण दिलंय.

'गुन्हा केला का? मला फासावर लटकवणार का?', बिर्याणीच्या प्रश्नावर इम्तियाज जलील यांचे सवाल
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 6:22 PM

छत्रपती संभाजीनगर : खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी साखळी उपोषणाची घोषणा केली. पण दुसऱ्याच दिवशी त्यांच्या आंदोलनस्थळी आंदोलक बिर्याणी खाताना दिसले. त्यामुळे शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) नेते आक्रमक झाले. इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. आता या बिर्याणीच्या प्रकरणावर इम्तियाज जलील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अतिशय मजेशीर उत्तरं दिली. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बिर्याणी खाल्ली तर काही गुन्हा केला का? मला फासावर लटकवणार का? असे प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले.

“त्यादिवशी खूप चांगली बिर्याणी झाली होती. बिर्याणीसाठी मटनही खूप चांगलं आणलं होतं. मी स्वत: लोकांना सांगितलं होतं की तुम्हाला हा इम्तियाज जलील स्वत: तुमच्या प्लेटमध्ये बिर्याणी टाकून देईल. तुम्ही मस्तपैकी बिर्याणी खा. विशेष म्हणजे या माणसाला आपण कसं विरोध करायचं? कारण हा माणूस खूप लॉजिकल बोलत आहे. आपण त्याच्यासोबत डिबेट करु शकत नाही. मग काय करायचं? कुठेतरी बघायचं. त्या व्यक्तीमध्ये काय चूक दिसते ते बघायचं. त्यातून मग त्यांना बिर्याणीची प्लेट दिसली. बिर्याणीची प्लेट दिसताच सर्वचजण त्यावर तुटून पडले. अरे बिर्याणीची प्लेट दिसली. मी तर त्यांना गपचूप सांगितलं, तुम्हाला आवडत असेल तर या. आपण गपचूप रात्री कोपऱ्यात बसून बिर्याणी खाऊ. खूप चांगली बिर्याणी आहे”, असं मिश्किल उत्तर इम्तिाज जलील यांनी दिलं.

‘उपोषण केलंच नाही ना, कुणी सांगितलं?’

यावेळी आमच्या प्रतिनिधींनी त्यांना उपोषणात बिर्याणी कशी काय? असा प्रश्न विचारला. “त्यावर उपोषण केलंच नाही ना, कुणी सांगितलं?”, असा उलटसवाल जलील यांनी केला. त्यावर आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी “मोहम्मद सोयेब नावाचे तुमचे स्वीय सहाय्यक आहेत, त्यांचा आलेला मेसेज आहे. नामांतराच्या विरोधातील आंदोलनाची इम्तियाज जलील यांच्याकडून घोषणा. शनिवारपासून बेमुदत उपोषण. खाली मायनामध्ये सांगितलं की, शनिवारी सकाळी 11 वाजता बेमुदत उपोषणाला सुरुवात होईल”, असं वाचून दाखवलं. त्यावर जलील यांनी उत्तर दिलं.

‘बिर्याणी खाल्ली तर काही गुन्हा आहे का?’

“आता समजा आम्ही पहिल्या दिवशी उपोषण केलं. दुसऱ्या दिवशी आम्ही निर्णय घेतला की आम्हाला बिर्याणी दररोज खायची आहे. मग तुम्ही मला फासावर लटकवणार का?”, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला. त्यावर आमच्या प्रतिनिधींनी उपोषणात बदल झाल्याची कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती? असं विचारलं. त्यावर इम्तियाज यांनी आणखी मजेशीर उत्तर दिलं. असं समजा उपोषणाच्या दरम्यान इम्तियाज जलील यांनी बिर्याणी खाल्ली तर काही गुन्हा आहे का? राईस कसा आणला? इतकी चांगली बिर्याणी खाल्ली कशी? म्हणता. मी दुसऱ्या दिवसापासून उपोषण सोडलं, असं जलील म्हणाले.

‘ते मी माझ्या मर्जीप्रमाणे…’

जलील यांना तुम्ही उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलं नाही ना? असा सवाल केला. त्यावर जलील म्हणाले, “नाही. ते मी माझ्या मर्जीप्रमाणे ना? मी आता लोकांना सांगेल की आज बिर्याणी नाही तर नान खलिया खाऊ घालणार. नान खलिया खाल्लंय का कधी? सर्व लोक तू बिर्याणी का खाल्ली? असं विचारत आहेत. मी स्वत: बिर्याणी काढून फोटोग्राफरला म्हटलं दाखव रे. मी सगळ्यांना सांगितलं.” “आंदोलन गेलं एका कोपऱ्यात बिर्याणी कशी खाल्ली? हा प्रश्न चर्चेत आला. मला बिर्याणीपेक्षा नान खलिया जास्त आवडतं. त्यामुळे दोन दिवसांनी मी नान खलिया देखील बनवणार आहे. आम्ही रोटी बनवण्याची तयारी केली आहे. दहा वाजता आपल्या आंदोलनाचा वेळ संपतो. माईक बंद करायचा आणि नान खलियावर ताव मारायचा”, असं इम्तियाज म्हणाले.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे आम्ही गेलो. एक दिवस आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे जाऊ. एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहायला जाऊ, एक दिवस छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जाऊ. आमचा शांतूपूर्व मार्गाने कँडल मार्च असेल. सर्व महापुरुषांना आदरांजली वाहू आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ”, असं जलील यांनी सांगितलं. “दुर्देव हे आहे की औरंगाबादमध्ये लढा देणारा एकच राहिलेला आहे. बाकी सगळ्यांना बिर्याणी कशी तयार झाली? याचाच विचार”, अशी खंत इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.