मोठी बातमीः औरंगाबादेत मालमत्ता करावर 75 टक्के सूट, महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त विशेष योजना
मालमत्ता कराच्या थकबाकीवर औरंगाबाद महानगरपालिका दरवर्षी चक्रवाढ व्याज लावते. त्यामुळे मूळ रकमेपेक्षा व्याजाची रक्कम जास्त होते. त्यामुळे अनेक मालमत्ताधारक कर भरत नाहीत, ही बाब पुढे आल्याने ही योजना जाहीर करण्यात आली.
औरंगाबादः महापालिकेच्या 8 डिसेंबर या वर्धापन दिनानिमित्त शहरातील मालमत्ता धारकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. मालमत्ता कराची (Property tax) थकबाकी एकरकमी भरल्यास व्याजावर 75 टक्के सूट देण्याची घोषणा महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey) यांनी मंगळवारी केली. मंगळवारी ही घोषणा करण्यात आली असून येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत ही योजना सुरु राहील, अशी माहिती पांडेय यांनी दिली.
करवसुलीसाठी महापालिकेचे प्रोत्साहन
मालमत्ता कराच्या थकबाकीवर औरंगाबाद महानगरपालिका दरवर्षी चक्रवाढ व्याज लावते. त्यामुळे मूळ रकमेपेक्षा व्याजाची रक्कम जास्त होते. त्यामुळे अनेक मालमत्ताधारक कर भरत नाहीत, ही बाब पुढे आल्याने ही योजना जाहीर करण्यात आली. प्रशासकांनी आता पालिकेच्या वर्धापन दिनापासून थकीत मालमत्ता करावीरल शास्ती व विलंब शुल्कावर 75 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
थकीत रक्कम एकरकमी भरावी लागणार
मंगळवारी या योजनेचा प्रस्ताव प्रशाकांनी मंजूर केला. तसेच योजनेत थकबाकीदारांनी एकरकमी कर भरला तरच ही योजना लागू होईल, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहिल. सद्या मालमत्ता सील करणे, नळ कनेक्शन कापण्याची मोहीम सुरु आहे. सर्व वॉर्ड कार्यालये वसुलीसाठी ही कारवाई सुरुच ठेवणार असल्याचे करमूल्य निर्धारण अधिकारी अपर्णा थेटे यांनी सांगितले.
इतर बातम्या