औरंगाबाद शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू, महापालिका हॉकर्स झोन पॉलिसी राबवणार

औरंगाबाद: औरंगाबाद महानरपालिका (Aurangabad Municipal Corporation) लवकरच फेरीवाला धोरण (hawkers zone policy) तयार करणार आहे. त्या आधी फेरीवाल्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी आणि रस्ता विक्रेते कायदा 2014 बद्दल फेरीवाल्यांमध्ये किती जागरूकता आहे हे जाणून घेण्यासाठी मनपा आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या माहितीवरून फेरीवाल्यांसाठी विशेष झोन तयार केले […]

औरंगाबाद शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू, महापालिका हॉकर्स झोन पॉलिसी राबवणार
फेरीवाला धोरणाच्या तयारीसाठी औरंगाबादेत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू.
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 4:11 PM

औरंगाबाद: औरंगाबाद महानरपालिका (Aurangabad Municipal Corporation) लवकरच फेरीवाला धोरण (hawkers zone policy) तयार करणार आहे. त्या आधी फेरीवाल्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी आणि रस्ता विक्रेते कायदा 2014 बद्दल फेरीवाल्यांमध्ये किती जागरूकता आहे हे जाणून घेण्यासाठी मनपा आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या माहितीवरून फेरीवाल्यांसाठी विशेष झोन तयार केले जातील, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. तसेच फेरीवाल्यांसमोरील अनेक समस्यांचेही निराकरण या मोहिमेद्वारे केले जाईल.

लवकरच धोरणाचा मसुदा तयार करणार

मनपा आयुक्त आणि प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांचा मार्गदर्शनाखाली औरंगाबाद महानगपालिका लवकरच फेरीवाला धोरण चा मसुदा तयार करणार आहे. ह्याचासाठी मनपा उपायुक्त अपर्णा थेटे आणि उपायुक्त सौरभ जोशी ह्यांना जवाबदारी दिली गेली आहे. त्यासाठी शहरातील 9 वॉर्ड मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

200 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण

यासाठी एमपी लॉ कॉलेजमधील प्राध्यापक अपर्णा कोतापल्ले यांच्या समन्वयाने महानगरपालिकेने 21 विद्यार्थ्यांची निवड केली आहे. १४ ऑक्टोबर पर्यंत ५०० फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. यापैकी २०० फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या गरजा, समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सर्वेक्षणाअंती आलेल्या निष्कर्षाच्या आधारावर हे फेरीवाला धोरण तयार करण्यात येणार आहे. याबरोबरच हे धोरण तयार करण्यासाठी दिल्लीतील IGSSS एनजीओमधील अॅड्रियन डिक्रूझ आणि अरविंद उन्नी सहकार्य करत आहेत. हे धोरण तयार करण्यासाठी सल्लागार म्हणून ते काम पाहत आहेत. अर्बन रिसर्च फाउंडेशनच्या पल्लवी देवरे आणि श्रीनिवास देशमुख यांनी देखील यासाठी सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांसाठी समन्वय आणि प्रशिक्षण देण्याचे काम ते करत आहेत.

फेरीवाल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न- आस्तिक कुमार पांडेय

औरंगाबाद शहराला आतापर्यंत फेरीवाला धोरण (हॉकर्स झोन पॉलिसी) नव्हते. त्यामुळे शहरात फेरीवाल्यांची समस्या वाढलेली दिसून येत आहेत. त्यामुळेच फेरीवाल्यांची समस्या सोडवण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिका प्रयत्नशील आहे. यासाठी फेरीवाल्यांबरोबरच सर्व भागधारकांना देखील सोबत घेऊन हे धोरण बनविण्यात येणार आहे. या धोरणामुळे फेरीवाले आणि भागधारक दोन्हींच्या समस्या सोडवता येतील, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त आणि प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.

इतर बातम्या-

औरंगाबाद: गुंठेवारीची मालमत्ता नियमित करा, अन्यथा १ नोव्हेंबरनंतर बुलडोझर चालणार, मनपाचा इशारा

थरकाप उडवणारा खून, नसा कापल्या, कान छाटले, डोक्यात हातोड्याचे वार, छातीवर बसून गळा चिरला, औरंगाबाद हादरलं!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.