Aurangabad: महापालिकेचा विक्रमी महसूल गोळा, 9 महिन्यात 102 कोटी रुपयांची कमाई!
नगर रचना विभागाला बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, लेआउट या माध्यमातून महसूल मिळतो. मागील वर्षी या विभागाने 70 कोटी रुपयांचा महसूल जमा केला होता. यंदा मात्र चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यातच 102 कोटी 89 लाख रुपये एवढा महसुल मिळवला आहे.
औरंगाबादः महापालिकेच्या नगररचना विभागाने यंदा नऊ महिन्यातच विक्रमी महसूल जमा केला आहे. या काळात पालिकेने तब्बल शंभर कोटी रुपयांची रक्कम करापोटी जमा केली आहे. विशेष म्हणजे यापैकी 35 कोटी रुपये हे मागील पन्नास दिवसातच जमा झाले आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या वसुलीचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विक्रम समजला जात आहे.
दीडशे कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज
महापालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. नगररचना विभागाकडे शुल्क वसुलीसाठी वेगळी यंत्रणा नाही. विभागातील मनुष्यबळाच्या आधारेच शुल्क वसुली केली जाते. नगर रचना विभागाला बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, लेआउट या माध्यमातून महसूल मिळतो. मागील वर्षी या विभागाने 70 कोटी रुपयांचा महसूल जमा केला होता. यंदा मात्र चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यातच 102 कोटी 89 लाख रुपये एवढा महसुल मिळवला आहे. त्यापैकी 35 कोटी रुपये हे मागील पन्नास दिवसात करापोटी महापालिकेकडे जमा झाले आहेत .
पुढील तीन महिन्यात आणखी वाढ
नगररचना विभागाच्या उत्पन्नात यंदा मोठी वाढ झाली आहे. मागील नऊ महिन्यातच 102 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी तीन महिने शिल्लक असून येत्या तीन महिन्यात महापालिकेच्या महसूलात आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा नगररचना विभागाचे उपसंचालक ए.बी. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
इतर बातम्या-