औरंगाबादः लेबर कॉलनीवासीय रस्त्यावर, जीव मुठीत, घरावर टांगती तलवार… 10.30 वाजता कारवाई होण्याच्या दिल्या होत्या सूचना…
औरंगाबादः जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लेबर कॉलनी (Aurangabad labor colony ) वसाहतीवर महापालिका आज बुलडोझर फिरवणार आहे. अवैध मालकी आणि जीर्ण वसाहती या दोन कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 31 ऑक्टोबर रोजी येथील रहिवाशांना आठ दिवसात घरे रिकामी करण्याची नोटीस दिली होती. ही डेडलाइन आज संपत असून आता 10.30 वाजता महापालिका काय […]
औरंगाबादः जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील लेबर कॉलनी (Aurangabad labor colony ) वसाहतीवर महापालिका आज बुलडोझर फिरवणार आहे. अवैध मालकी आणि जीर्ण वसाहती या दोन कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 31 ऑक्टोबर रोजी येथील रहिवाशांना आठ दिवसात घरे रिकामी करण्याची नोटीस दिली होती. ही डेडलाइन आज संपत असून आता 10.30 वाजता महापालिका काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शासनाने अगदी कमी कालावधीच्या नोटिसीवर घरे रिकामी करण्याची नोटीस लावली असून कोणतीही कायदेशीर याचिकाप्रक्रिया करायला वेळ दिला नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
रहिवासी रस्त्यावर, महिला-बालकांमध्ये अस्वस्थता
लेबर कॉलनीतील घरांवर आज बुलडोझर चालणार असल्याच्या नोटीसीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. रविवारी रात्री अवघी कॉलनी जागी होती. रविवारी दिवसभर येथील महिला-पुरुष कॉलनीत येणाऱ्या प्रत्येकावर नजर ठेवून होते. कॉलनीत येणाऱ्या प्रत्येकजण जणू आपल्यावर कारवाई करण्यासाठी येतोय की काय असा संशय घेतला जात होता. आज सकाळपासूनच कॉलनीतील महिला, पुरुष , लहान मुले रस्त्यावर उतरले आहेत. महापालिकेचे अधिकारी कधीही येऊन आपल्या घरावर बुलडोझर चालवू शकतात, ही एकच भीती या नागरिकांच्या मनात आहे.
एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट
लेबर कॉलनीतील रहिवाशांच्या बाजूने विविध राजकीय पक्षांनी भूमिका घेतली असून आज ही कारवाई रोखण्यासाठी विविध पक्षांचे नेते लेबर कॉलनीला भेट देत आहेत. तसेच दुपारी 12.30 च्या सुमारास येथील महिलांचे एक शिष्टमंडळ पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
डेडलाइन संपली, कारवाईवर प्रशासन ठाम
31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिकेने लेबर कॉलनीत पोलिसांचा मोठा फौजफाटा आणत आठ दिवसात घरे रिकामी करा, असे फ्लेक्स लावले. त्या दिवसापासून येथील रहिवाशांची झोप उडाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दिलेली ही घरे निवृत्तीनंतरही कुटुंबियांनी सोडलीच नाहीत, त्यावर भाडेकरू, पोटभाडेकरू ठेवले तसेच काही घरांची बाँडपेपरवर विक्रीही केली आहे. ही अवैध मालकी सोडण्याची नोटीस जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली आहे. तसेच येथील घरे अत्यंत जीर्ण झाल्याचा अहवाल शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समितीने दिला आहे. या दोन कारणास्तव जिल्हा प्रशासनाला या जागेवरील बेकायदेशीर कब्जेदारांना हटवायचे आहे.
इतर बातम्या-