Aurangabad | शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात वंचित आघाडी आक्रमक, औरंगाबाद, परभणीत आंदोलन
औरंगाबादः हिंगोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी प्रकाश आंबेडकरांविरोधात केलेल्या आरोपांचे पडसाद ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे (Vanchit Bahujan Aghadi) क्रांती चौकात संतोष बांगर यांचा पुतळा जाळण्यात आला तर परभणी येथेही वंचितच्या कार्यकर्त्यांमार्फत जोडे मारो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash […]
औरंगाबादः हिंगोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी प्रकाश आंबेडकरांविरोधात केलेल्या आरोपांचे पडसाद ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे (Vanchit Bahujan Aghadi) क्रांती चौकात संतोष बांगर यांचा पुतळा जाळण्यात आला तर परभणी येथेही वंचितच्या कार्यकर्त्यांमार्फत जोडे मारो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मागील निवडणुकीत एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांचा मते फोडण्यासाठी वापर केला आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. हिंगोलीतील जवळाबाजार येथील मेळाव्यात त्यांनी हा आरोप केला. त्यानंतर राज्यभरात वंचित आघाडीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बांगर यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
औरंगाबादमध्ये क्रांती चौकात आंदोलन
शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेल्या खळबळ जनक आरोपानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संतोष बांगर यांच्या पुतळ्याला जोडे मारत पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी संतोष बांगर जर महाराष्ट्रात कुठेही दिसला तर त्याच्या तोंडाला काळे फासू असा इशाराही देण्यात आला आहे.
परभणीतही जोडे मारण्याचा इशारा
परभणीतदेखील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. संतोष बांगर यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.
संतोष बांगर यांचं वक्तव्य काय?
हिंगोलीतील जवळा बाजार येथे बोलताना शिवसेना आमदार संतोष बांगर म्हणाले, भाजप मतं विभाजीत करते. त्यासाठीच त्यांनी एमआयएमला पुढे केलं असणार. गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा त्यासाठीच वापर केला गेला. त्यासाठी एक हजार कोटी रुपये दिले गेले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. तसेच प्रकाश आंबेडकर यांना आपल्या बौद्ध समाजाला ताकद दाखवायची असेल तर ते कुणाच्या भरोशावर, असा सवालही बांगर यांनी उपस्थित केला होता.
इतर बातम्या-