प्रसिद्ध कंपन्यांचे लेबल लावून बनावट माल विक्री करणारे जेरबंद, औरंगाबादमध्ये तिघांना बेड्या

औरंगाबादः प्रसिद्ध कंपन्यांचा बनावट माल तयार करून विक्री करणाऱ्या तिघांना औरंगाबादमध्ये (Aurangabad crime) अटक करण्यात आली आहे. या तिघांच्या ताब्यातून 1 लाख 19,830 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. साबण, टॉयलेट क्लिनर, बिड्या असा 39,320 रुपयांचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 1 लाख 19,830 रुपयांचा माल पोलिसांनी (Aurangabad police) जप्त केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ […]

प्रसिद्ध कंपन्यांचे लेबल लावून बनावट माल विक्री करणारे जेरबंद, औरंगाबादमध्ये तिघांना बेड्या
बनावट मालावर प्रसिद्ध कंपन्यांचे लेबल लावून विक्री करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 11:06 AM

औरंगाबादः प्रसिद्ध कंपन्यांचा बनावट माल तयार करून विक्री करणाऱ्या तिघांना औरंगाबादमध्ये (Aurangabad crime) अटक करण्यात आली आहे. या तिघांच्या ताब्यातून 1 लाख 19,830 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. साबण, टॉयलेट क्लिनर, बिड्या असा 39,320 रुपयांचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण 1 लाख 19,830 रुपयांचा माल पोलिसांनी (Aurangabad police) जप्त केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सदर कारवाई करण्यात आली. नामांकित कंपन्यांचे लेबल लावलेले बाम, साबण, टॉयलेट क्लिनर, बिड्या असे साहित्य तीन आरोपींनी लोडिंग रिक्षात टाकलेले होते. पोलिसांनी या मालाची तपासणी केली असता हा माल बोगस असल्याचे उघड झाले. या कारवाईत अक्षय जाधव, शेख मोसिन यांना ताब्यात घेण्यात आले. रिक्षात सापडलेला माल 39,320 रुपयांचा होता.

मोठं रॅकेट असण्याची शक्यता

या कारवाईत पकडलेल्या आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी हा माल बीड बायपास येथील सय्यद मोहसीन मीर याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. तसेच सय्यद हा अनेकांना असा माल विकत असल्याचेही सांगितले. पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे यांनी आरोपीला शोधून कंपनीच्या अधिकाऱ्यांना सोबत घेतले व त्यास मोंढा नाका येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडून 9490 रुपये किंमतीच्या बनावट बिड्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक अशोक गिरी, दुय्यम पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल देशराज मोरे व कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

इतर बातम्या-

लसीकरणाचे नियम डावलले, औरंगाबादमध्ये बाबा पेट्रोल पंप सील, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

एकविरेच्या दर्शनाहून परतताना भीषण अपघात, तिघा भाविकांचा मृत्यू, चिमुकल्यांसह 9 जण गंभीर

सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.