Aurangabad | औरंगाबादचं पालकमंत्री पद कुणाकडे? संजय शिरसाट चर्चेत, पण शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची संधी भाजप सोडणार का?

मराठवाड्यातील शिंदे सेनेवर पकड ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना औरंगाबादचं पालकमंत्री पद देतील, अशी एकिकडे चर्चा आहे. मात्र यासाठी भाजप किती प्रतिसाद देईल, हेही पहावे लागणार आहे

Aurangabad | औरंगाबादचं पालकमंत्री पद कुणाकडे? संजय शिरसाट चर्चेत, पण शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची संधी भाजप सोडणार का?
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 6:32 PM

औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलंय. त्यानंतर आता शिंदे सरकारमधील (Maharashtra CM) वजनदार आमदारांना लवकरच महत्त्वाची खातेवाटप होणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच बंडखोर आमदार शिंदे गटात गेले आहेत. त्यापैकी तिघांना तगडी खाती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील पाचही बंडखोरांना एकत्र करून त्यांचं मन वळवण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेल्या संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या वाट्याला महत्त्वाचं पद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शिरसाट यांना औरंगाबादचं पालकमंत्री पद देण्यात येण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. मागील काही महिन्यांपासून राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वात जवळचे आमदार अशी त्यांची प्रतिमा बनली होती. त्यामुळेच नगरविकास खात्यातून त्यांना जास्त निधी मिळाल्याचीही चर्चा आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पद शिवसेना आमदाराकडे देणं, भाजपाला कितपत रूचेल, हेही सांगणं कठीण आहे.

औरंगाबादच्या बंडखोरीत मोठी भूमिका

मागील दोन वर्षात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील सातारा देवळाई परिसराच्या विकासासाठी आमदार संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून भरपूर निधी मिळवला. शिंदे यांनीही शिरसाट यांना तो मुक्त हस्ते दिला. त्यामुळेच उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे यांचे ते अधिक निकटवर्तीय मानले जाऊ लागले. त्यातच एकनाथ शिंदेंच्या गटात औरंगाबादच नव्हे तर मराठवाड्यातील इतर आमदारांना जाण्यासाठी संजय शिरसाट यांनीच मन परिवर्तन केले, अशी चर्चा अनेक स्थानिक नेते करत आहेत. यापूर्वीच महाविकास आघाडी सरकारमध्ये शिरसाट यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पैठणचे संदिपान भूमरे यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले. तर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्री बनवले. तेव्हापासून संजय शिरसाट अस्वस्थ असल्याची चर्चा होती. आता एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये त्यांची अपेक्षा पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.

स्पर्धेत भाजपचे कोण आमदार?

मराठवाड्यातील शिंदे सेनेवर पकड ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना औरंगाबादचं पालकमंत्री पद देतील, अशी एकिकडे चर्चा आहे. मात्र यासाठी भाजप किती प्रतिसाद देईल, हेही पहावे लागणार आहे. कारण शिवसेनेचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेत भाजपदेखील आपलं वजन वाढवण्याच्या पवित्र्यात आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि जालन्याचे रावसाहेब दानवे यांच्या रुपाने मराठवाड्याला दोन मंत्री मिळाले आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच औरंगाबादमधील भाजपाचे संघटन वाढवण्यावर भर दिला जातोय. त्यामुळे शिवसेनेचा पालकमंत्री होणं, भाजपाचा किती पडनी पडेल हेही पहावं लागेल. जिल्ह्यात भाजपाचा दबदबा वाढवण्यासाठी आमदार अतुल सावे, प्रशांत बंब यांची नावं पालकमंत्री पदाच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे हीदेखील शक्यता नाकारता येत नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.