Aurangabad | रेल्वे स्टेशन परिसरात चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना, नातेवाईकांना सोडायला आलेल्यांची सोय!

पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आणि प्रदुषणाला (Pollution) आळा घालण्यासाठी औरंगाबाद महापालिका तसेच शहरातील उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने (E Vehicle) खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच ही वाहने चार्ज करण्यासाठी शहरात 250 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे.

Aurangabad | रेल्वे स्टेशन परिसरात चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना, नातेवाईकांना सोडायला आलेल्यांची सोय!
रेल्वे स्टेशन परिसरात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी चाचपणी Image Credit source: Railway.in
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 6:00 AM

औरंगाबाद| तुम्ही नातेवाईकांना किंवा मित्र-मैत्रिणीला सोडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आलात, रेल्वे निघेपर्यंत तुम्हाला तुमची ई कार चार्जिंग करायची असेल तर तशी सुविधा लवकरच औरंगाबादच्या रेल्वे स्टेशनवर (Railway Station) पहायला मिळेल. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने आणि प्रदुषणाला (Pollution) आळा घालण्यासाठी औरंगाबाद महापालिका तसेच शहरातील उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील नागरिकांना इलेक्ट्रिक वाहने (E Vehicle) खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच ही वाहने चार्ज करण्यासाठी शहरात 250 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. यापैकीच एक चार्जिंग स्टेशन रेल्वे परिसरात उभारण्यासाठी महापालिकेतर्फे जागेची पाहणी करण्यात आली आहे. लवकरच येथे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी आल्यानंतर वाहनाचे चार्जिंग करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

शाश्वत विकासाच्या दृष्टीने औरंगाबादचे पाऊल

शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत केंद्र आणि राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केलेले आहे. इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती, विक्री तसेच वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन या करिता पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासनातर्फे प्रोत्साहन दिले जात आहे. औरंगाबादमध्येही या पर्यावरणपूरक उपक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार आता रेल्वे स्टेशन परिसरातही चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठ हालचाली सुरु झाल्या आहेत.

चार्जिंग स्टेशनसाठी शहरात प्रोत्साहन

वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या पाहता शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहेत. राज्यात यापूर्वीत महावितरणसह काही खासगी संस्थांनी निवडक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारले आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर पाहता, मोठ्या संख्येने चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता भासणार आहे. मराठवाड्यातही महामार्गांवर हॉटेल्स, पेट्रोलपंप व इतर आस्थापनांच्या मोकळ्या जागेत तसेच शहरातील महत्त्वाच्या जागी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्रचंड वाव आहे.

मिशन ग्रीन मोबिलिटी जोमात

औरंगाबादेत मराठवाडा ऑटो क्लस्टरच्या माध्यमातून मिशन ग्रीन मोबिलिटी अंतर्गत औरंगाबादच्या उद्योजकांनी प्रदूषण निर्मूलनाची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत गेल्या काही महिन्यात 250 चारचाकी ईलेक्ट्रिक वाहने बुक करण्यात आली. त्यापैकी 101 इलेक्ट्रिक वाहनांचे नुकतेच वितरण करण्यात आले. तसेच तीन चाकी ई वाहन खरेदीसाठीदेखील या मिशनअंतर्गत प्रोत्साहन देण्यात आले आले. त्यानंतर दुचाकी आणि ई बस रस्त्यावर आणण्यासाठी या उपक्रमाअंतर्गत प्रयत्न केले जातील.

इतर बातम्या-

अमरावतीत उन्हाचा कडाका वाढला; गेल्या 15 वर्षातील सर्वोच्च तापमानाची नोंद, शाळेच्या वेळेत बदल

Nanded Crime | पत्नीची हत्या करुन शेतात पतीची आत्महत्या, कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.