Raj Thackeray | औरंगाबादेत 09 मेपर्यंत जमावबंदीचे आदेश, राज ठाकरेंची सभा होणार का? मनसे आणि पोलीस भूमिकेवर ठाम

राज ठाकरे यांच्या सभेसाठी अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मात्र त्यातूनही आम्ही ही ऐतिहासिक सभा घेणारच आहोत. राज ठाकरे यांच्या सभेला पोलीसदेखील परवानगी देतील, असा विश्वास औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी व्यक्त केला.

Raj Thackeray | औरंगाबादेत 09 मेपर्यंत जमावबंदीचे आदेश, राज ठाकरेंची सभा होणार का? मनसे आणि पोलीस भूमिकेवर ठाम
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 3:04 PM

औरंगाबादः येत्या 01 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची जाहीर सभा औरंगाबाद आयोजित करण्यात आली आहे. मात्र औरंगाबाद पोलिसांच्या (Aurangabad police)नव्या आदेशानंतर ही सभा होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्या सभेला आधीच जवळपास 13 राजकीय संघटनांनी विरोध दर्शवला आहे. पोलिसांनीदेखील सभेला अद्याप परवानगी दिलेली नव्हती. त्यातच आता येत्या 09 मे पर्यंत आता औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशा स्थितीत राज ठाकरे यांच्या विराट सभेला किमान एक लाख लोक येतील, असा दावा मनसेतर्फे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काढलेल्या आदेशामुळे मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा ठरलेल्या वेळेत आणि ठरलेल्या ठिकाणी होईल की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

09 मेपर्यंत औरंगाबादेत जमावबंदी

राज ठाकरे यांच्या सभेची औरंगाबादमध्ये जोरदार तयारी सुरु असतानाच मनसेला मोठा झटका बसलाय. पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी शहरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. औरंगाबाद शहराच्या हद्दीत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था बिघडू नयेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता मनसेसमोर मोठे आव्हान आहे.

विराट सभा होणारच- मनसेचा निर्धार

राज ठाकरे यांच्या सभेसाठी अनेक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. मात्र त्यातूनही आम्ही ही ऐतिहासिक सभा घेणारच आहोत. राज ठाकरे यांच्या सभेला पोलीसदेखील परवानगी देतील, असा विश्वास औरंगाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी व्यक्त केला. शहरात जमावबंदी लागू झाली असली तरीही आज किंवा उद्या पोलिसांकडून ही परवानगी मिळेल, असं वक्तव्य सुमित खांबेकर यांनी केलंय.

इतर बातम्या-

Palgahr | पालघरच्या शिक्षणाधिकाऱ्याला लाच घेताना अटक

Chiranjeevi: “त्यावेळी दिल्लीत मला अपमानित झाल्यासारखं वाटलं”; चिरंजीवी यांनी सांगितली 33 वर्षांपूर्वी घडलेली घटना

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.