Aurangabad | पावसाळ्यापूर्वी महापालिकेत बैठकांचा धडाका, 9 महिन्यात 107 रस्त्यांची कामं करणार, वाचा आणखी कोणते निर्णय?

स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान यांनी सांगितले की सर्व 107 च्या ड्रोन सर्वे झाले आहेत. सर्व रस्त्यांचे काम निविदेतील अटीनुसार 9 महिन्यांत पूर्ण होतील. ह्यातील छोट्या 21 रोडचे काम एका महिन्यात होऊ शकते.

Aurangabad | पावसाळ्यापूर्वी महापालिकेत बैठकांचा धडाका, 9 महिन्यात 107 रस्त्यांची कामं करणार, वाचा आणखी कोणते निर्णय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 1:45 PM

औरंगाबादः मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी पावसाळ्यापूर्वीची तयारी, पाणीपुरवठा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर स्मार्ट सिटीच्या (Smart city) कार्यालयात एकानंतर एक बैठका घेतल्या. योग्य तज्ञांद्वारे गुणवत्ता तपासणी करून नव्याने हाती घेतलेल्या प्रकल्पांत प्रत्येक कामाला दर्जेदार पद्धतीत व निर्धारित वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांनी अधिकारी व कंत्राटदाराच्या बैठकीत दिले. केंद्र सरकार, राज्य शासन व औरंगाबाद महानगपालिकेतर्फे (Aurangabad municipal corporation) प्रायोजित औरंगाबाद स्मार्ट सिटी ने मार्च महिन्यात स्मार्ट रोड, स्मार्ट हेल्थ व स्मार्ट स्कूल सारखे महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रियाद्वारे कंत्राट दिले. ह्या प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी मनपा प्रशासक व आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांनी स्मार्ट सिटी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा थेटे, अतिरिक्त मनपा आयुक्त बीबी नेमाने, शहर अभियंता सखाराम पानझडे, सर्व स्मार्ट सिटी चे अधिकारी व हाथी घेतलेल्या प्रकल्पांसाठी नियुक्त कंत्राटदारांची बैठक घेतली. या बैठकांमध्ये आणखी कोणते निर्णय झाले, ते पुढील प्रमाणे-

  • स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान यांनी सांगितले की सर्व 107 च्या ड्रोन सर्वे झाले आहेत. सर्व रस्त्यांचे काम निविदेतील अटीनुसार 9 महिन्यांत पूर्ण होतील. ह्यातील छोट्या 21 रोडचे काम एका महिन्यात होऊ शकते. रोडचे काम दर्जेदार होतील ह्यासाठी आय आय टी बॉम्बेच्या तज्ञांकडून तपासणी होईल.
  • सफारी पार्कच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामांचे नकाशे तयार आहेत. सल्लागारांकडून पाहणीनंतर साइटच्या कामाला सुरुवात होईल,असे स्मार्ट सिटीचे अभियंता यांनी सांगितले. या कामाच्या गुणवत्तेची तपासणीसाठी ड्रॉइंग्स शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद यांना सोपवली गेली आहे.
  • स्मार्ट सिटीने सफारी पार्कच्या जमिनीच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार त्यांच्यासाठी पर्यायी रस्ता बनवण्यात येत आहे. यासाठी डांबरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे.
  • सफारी पार्क पर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहण करावयाचे आहे. बैठकीत मनपा प्रशासक यांनी जमीन अधिग्रहित करण्यासाठी जागेचं मूल्यांकन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार करायचा आहे असे सांगितले. यावर तत्काळ कारवाई करण्यासाठी नगररचना उपसंचालक एबी देशमुख यांना निर्देशित केले.
  • स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटी मनपाच्या 54 शाळांचा कायापालट करणार आहे. या प्रकल्पात बांधकाम फर्निचर व आयटी असे तीन घटक आहेत.
  • या प्रकल्पासाठी नियुक्त एजन्सी विक्रम इन्फ्रा यांनी सांगितलं की एका शाळेच्या दुरुस्ती बांधकामासाठी पंधरा दिवस ते एक महिना लागणार आहे. यासाठी काम सुरू झाले आहे.
  • सीईओ यांच्या निर्देशानुसार गारखेडा येथे मनपा शाळेत स्मार्ट स्कूलचा आदर्श डेमो तयार करण्यात येईल. या डेमो च्या आधारे बाकीचे स्कूल तयार करण्यात येतील.
  • स्मार्ट हेल्थ या प्रकल्पांतर्गत 3 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बनवण्यासाठी एन 2, एन 12 व आंबेडकर नगर येथे सर्वेक्षण पूर्ण झाला आहे. याचे डिझाईन वर्क संबंधी चर्चा करून फायनल करण्यात येणार आहे.
  • संत तुकाराम नाट्यगृह याचे दुरुस्ती चे काम पुण्यातील कॉन्सेप्ट काँक्रिट यांना दिले गेले आहे. येथील स्टेज यंत्रणा बसवण्याचे काम जेडी एंटरप्राइज यांना देण्यात आले आहे.
  •  कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून घेतलेल्या जमिनी वर स्मार्ट सिटी बससाठी बस डेपो तयार करण्यात येत आहे. यासाठी नियुक्त एजन्सी बिबी इन्फ्रा यांनी सांगितलं की जमीन क्लियर करण्यात आलेली आहे व सोलींग चे काम पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल. नगररचना उपसंचालक एबी देशमुख यांना प्रशासकांनी जमिनीशी संबंधित व 36 मीटर रोड ची रुंदीकरण बद्दल प्रश्न लवकरच सोडवण्याचे निर्देश दिले.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.