Aurangabad School | औरंगाबाद ग्रामीण भागात आजपासून सर्व वर्ग सुरु, शहरातील शाळांसाठी काय निर्णय?

महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मनपा हद्दीतील शाळांचे आठवी, नववी आणि अकरावीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय मात्र आणखी आठवडाभराने घेतला जाईल.

Aurangabad School | औरंगाबाद ग्रामीण भागात आजपासून सर्व वर्ग सुरु, शहरातील शाळांसाठी काय निर्णय?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 9:33 AM

औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर (Corona Third Wave) ओसरू लागल्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील (Aurangabad district school) पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु होतील, असा निर्णय काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे (Nilesh Gatne) यांनी जाहीर केला. मात्र शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी कोरोनाचे नियम पाळण्यासंबंधीच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 24 जानेवारी रोजी ग्रामीण भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता आठवडाभरातच पहिली ती सातवीचे वर्गही सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील सर्व वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरु होत आहेत. शिक्षकांचीही 100 टक्के उपस्थिती आणि पूर्ण वेळ शाळा सुरु होणार असून आगामी परीक्षांच्या तयारीकरिता विद्यार्थ्यांना काहीसा वेळ मिळेल.

शाळा सुरु, पण उपस्थिती आहे का?

मागील आठवड्यात ग्रामीण भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. मात्र सुरुवातीला विद्यार्थ्यांची अत्यंत कमी उपस्थिती होती. हळू हळू सोमवारनंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे. सध्या सराव परीक्षा, प्रात्यक्षिक, सर्व विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. आता पहिली ते सातवीचे वर्गही सुरु झाल्यानंतर आठ ते दहा दिवसात हळू हळू विद्यार्थी संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरातील शाळांसाठी काय निर्णय?

शहरातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय एक आठवड्यानंतर घेण्यात येईल, असे मनपाचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग कमी होतोय. हे प्रमाण आणखी कमी झाल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, मागील आठ दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. सोमवारी शहरात फक्त 212 रुग्ण आढळले. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मनपा हद्दीतील शाळांचे आठवी, नववी आणि अकरावीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय मात्र आणखी आठवडाभराने घेतला जाईल.

इतर बातम्या-

स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार, पोलिसांची छापेमारी, दोन तरुणींसह चौघे रंगेहाथ सापडले

Rani Chatterjee No Makeup : अभिनेत्री राणी चॅटर्जी फिट राहण्यासाठी घेत आहे खास मेहनत, पाहा फोटो!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.