शिवसेना उपतालुका प्रमुखाचा प्रेयसीच्या घरात गळफास, कुटुंबाला हत्येचा संशय
शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे (Aurangabad Shiv Sena leader Sunil Khajindar commits suicide).
औरंगाबाद : शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आणि दौलताबाद ग्रामपंचायत सदस्य सुनील खजिनदार यांनी प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, मृतकाच्या कुटुंबियांनी हत्येचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शेकडोंच्या जमावाने दौलताबाद पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला आहे. या घटनेमुळे दौलताबादेत तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भीतीने गावातील दुकाने, बाजारपेठ बंद आहेत (Aurangabad Shiv Sena leader Sunil Khajindar commits suicide).
आत्महत्येमागील कारण काय?
सुनील यांनी दौलताबाद येथील मुजीब कॉलनीतील घरात गुरुवारी (18 मार्च) गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील हे एका लोखंडी साखळीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करुन अकस्मात मृत्यूचू नोंद केली. दरम्यान, सुनील यांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे (Aurangabad Shiv Sena leader Sunil Khajindar commits suicide).
परिसरात खळबळ
सुनील यांनी काल संध्याकाळी आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण रात्री उशिरापर्यंत समोर आलं नव्हतं. विशेष म्हणजे त्यांनी प्रेयसीच्या घरातच आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस ठाण्यासमोर शेकडोंची गर्दी
सुनील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालयात त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणला. तिथे सुनील यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी शेकडो नागरिकांनी दौलताबाद पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. अनेकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आता याप्रकरणी पोलीस काय कारवाई करतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.