Ashadhi Ekadashi | आषाढीसाठी मागणीनुसार एसटी मिळणार, 45 प्रवासी जमले की सांगाल तिथे बस! औरंगाबाद आगारात कुणाशी संपर्क साधाल?
राज्य परिवहन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 10 जुलै या तारखेदरम्यान, प्रवासी जसे जमतील, तशा पंढरपूरच्या दिशेने बस सोडण्यात येतील .
औरंगाबादः राज्यात प्रचंड राजकीय घडामोडी सुरु असताना महाराष्ट्रातील जनतेला पंढरपूरच्या वारीचे (Pandharpur Wari) वेध लागले आहेत. येत्या 10 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) हजारो भाविक पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जाण्याच्या तयारीत आहेत. त्याकरिता विविध जिल्ह्यांतून राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. औरंगाबादेतून पंढरपूरला (Aurangabad-Pandharpur) जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन शहरातील मध्यवर्ती, सिडको आगारसह जिल्ह्यातील 8 आगारांतून 7 ते 10 जुलैदरम्यान 150 ज्यादा बस सोडण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रकानी दिली आहे. तसेच भाविक आणि पर्यटकांची संख्या आणि मागणीनुनसार 24 तास बसेस सोडण्यात येणार आहेत. 40 ते 45 प्रवासी जमले की एक बस सोडण्यात येईल.
मागणीनुसार बस पुरवणार
आषाढी एकादशीनिमित्त विठुमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूर वारीला जाण्याची लगबग सुरु झाली आहे. काहींनी वारीत सहभाग घेऊन पंढरपूरकडे प्रस्थानही केले आहे. 10 जुलै रोजीच्या आषाढी एकादशीकरिता निघालेल्या वारीत जे सहभागी नाही होऊ शकले, अशा वारकऱ्यांचीही संख्या मोठी असते. त्यामुळे अशा भाविकांसाठी बसेसची सुविधा केली जाते. राज्य परिवहन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 10 जुलै या तारखेदरम्यान, प्रवासी जसे जमतील, तशा पंढरपूरच्या दिशेने बस सोडण्यात येतील . विशेष म्हणजे एखादे गाव, वॉर्डातून भाविकांनी बसची मागणी केली तर त्यांना तेथून बससेवा उपलब्ध करून देण्याची हमी विभाग नियंत्रकांनी घेतील आहे.
बस स्थानकावर सुरक्षा व्यवस्था
एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची ऐन एकादशीच्या काळात बस स्थानकावर खूप गर्दी होते. बसमध्ये जागा पकडण्यासाठी जिवााची पर्वा न करता प्रवासी धावपळ करतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. याचा विचार करून सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे नियोजन परिवहन मंडळातर्फे केले जात आहे.
औरंगाबादेत आठ आगारातील संपर्क क्रमांक असे-
सिडको-
- 8329881675- ल.वि. लोखंडे
- 7972153693- स. सु. सूर्यवंशी
मध्यवर्ती-
- संतोष घाणे- 9420031003-
- ल. दि. शहा- 7972860922
पैठण-
- सुहास तरवडे- 9561566421
- ग.ल. मडके- 9423792007
सिल्लोड-
- चव्हाण- 8668784158
- चव्हाण- 7666151317
वैजापूर-
- हेमंत नेरकर- 9420615287
- भा. खं. गरूड- 8208360872
कन्नड-
- भारती- 8668404020
- काळवणे- 9860982872
गंगापूर-
- जवळीकर- 9765538484
- गो. ज. पगारे- 9673542576
सोयगाव-
- हिलाल ठाकरे- 9665657014
- बागूल- 9637936474