तलवारीचे सपासप् वार, तो जिवाचा आकांत करु लागला, मदत केली तर एकेकाला बघून घेऊ… औरंगाबादमध्ये गुंडगिरीचा कळस!

26 जानेवारी रोजी एका लग्नात तलवार घेऊन दोघे नाचत असल्याचा व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. तेथून बाहेर पडताच त्यांनी हा गुन्हा केला.

तलवारीचे सपासप् वार, तो जिवाचा आकांत करु लागला, मदत केली तर एकेकाला बघून घेऊ... औरंगाबादमध्ये गुंडगिरीचा कळस!
नोकरी लावण्यासाठी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 6:41 AM

औरंगाबादः शहरातील पुंडलिक नगर (Pundlik Nagar) भागातील गुंडगिरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी रात्री अशीच एक थरारक घटना (Aurangabad crime) घडली. सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याचे डोके, पाठीवर एवढे वार केले की तो घटनास्थळी गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेतच तो मदतीसाठी लोकांना याचना करु लागला. त्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी घराबाहेर आले. मात्र कुणी बाहेर आले तर एकेकाला बघून घेऊ, अशी धमकी आरोपींनी दिली. अखेर तरुणाच्या मित्रांनी घटनास्थळी धाव घेत, त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. या तरुणाला एवढ्या जखमा झाल्या होत्या की, त्याच्या डोक्याला तब्बल 70 टाके द्यावे लागले. औरंगाबाद पोलिसांनी (Aurangabad police) या प्रकरणी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.

काय घडलं त्या दिवशी?

या घटनेत शुभम विनायक मनगटे या 24 ववर्षीय तरुणावर शनिवारी रात्री हल्ला झाला. शुभम हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी राजू पठाडे, यश पाखरे, शुभम मोरे, अतिश मोरे, शेख बादशाह, निलेश धस आणि त्याच्यासोबतचे दोन अनोळखी युवक शनिवारी रात्री शुभमच्या दुकानावर आले. त्यांनी दोनदा फुकट गुटखा व तंबाखू मागितली. ते देण्यास शुभमने नकार दिला. याचाच राग येऊन आरोपींनी त्याला घराच्या बाजूला रेणुकानगर येथे असलेल्या मोकळ्या जागेवर नेत मारहाण करण्यास सुरुवात केली. कपाळावर दगड मारण्यात आले, पाठीवर चाकूने वार केले. पठाडेने शुभमच्या डोक्यात तलवारीने वार केले. यात तो गंभीर जखमी होऊन रक्तस्राव सुरु झाला.

नागरिकांनाही धमकी दिली..

धारदार शस्त्रांनी वार केल्यामुळे शुभम गंभीर जखमी झाला. तो जिवाच्या आकांताने ओरडू लागला. त्यामुळे परिसरातील नागरिक घराबाहेर आले. पण कुणी मदत केली तर एकेकाला बघून घेऊ, अशी धमकी आरोपींनी दिली. अखेर शुभमच्या मित्रांनी धाव घेत त्याला परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पुंडलिक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, रविवारी सकाळपर्यंत चार आरोपींना अटक केली होती. पाचव्या आरोपीला दुपारी ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नात तलवार घेऊन नाचणारे हेच!

या गुन्ह्यातील आरोपी यश आणि बादशहा यांच्यावर शस्त्र बाळगल्याप्रकरणी तीन ते चार दिवसांपूर्वीच पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 26 जानेवारी रोजी एका लग्नात तलवार घेऊन दोघे नाचत असल्याचा व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. तेथून बाहेर पडताच त्यांनी हा गुन्हा केला.

इतर बातम्या-

Beauty care tips: या 5 वारंवार केलेल्या चुका तेलकट त्वचा आणखीनच खराब करते, जाणून घ्या याबद्दल!

नागपुरातील वृक्ष गणना नव्याने करण्याचे प्रस्तावित; किती असेल शहरात झाडांची संख्या?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.