Aurangabad: सावत्र बापानं सांगितलं मुलगा कोरोनानं गेला, इकडे कॉलनीतल्या तरुणांना काय दिसलं?
भोळसर मुलाला आय़ुष्यभर सांभाळण्याचे जीवावर आल्याने सावत्र बापाने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. औरंगाबादमध्ये गुरुवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
औरंगाबादः पैशांसाठी माणुसकी कुठल्या थराला जाऊ शकते याचा दाखला देणारी घटना औरंगाबादमध्ये उघडकीस आली आहे. वाळूज परिसरात राहणाऱ्या एका बापाचा मुलगा थोडा भोळसर असल्याने त्याला मुलाला भिक मागायला भाग पाडला. तसंच घराच्या आसपास लोकांना तो मृत झाल्याचे सांगत, त्याचा दशक्रिया विधीही उरकला. मात्र तीन दिवसांपूर्वी कॉलनीतल्या काही तरुणांना तो घाटी परिसरात भिक मागताना दिसून आल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
काय घडलं नेमकं?
घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणगाव भागात राहणाऱ्या 17 वर्षीय भोळसर मुलाच्या आईने पहिल्या पतीने निधन झाल्यावर सहा महिन्यांपूर्वी दुसरे लग्न केले. दरम्यान तिचा पहिल्या नवऱ्यापासूनचा मुलगा भोळसर असल्याने त्याला आयुष्यभर सांभाळावे लागू शकते, असे सावत्र बापाला वाटले. त्याने एक वेगळाच कट रचला. मुलाच्या छातीत दुखत आहे, असे सांगून त्याला घाटी रुग्णालयात नेले. तेथेच सोडून आला. हा भोळसर मुलगा घाटीच्या आवारातच भीक मागू लागला. इकडे घरी आल्यानंतर बापाने मुलाचे कोरोनामुळे निधन झाल्याचे शेजाऱ्यांना सांगून जिवंतपणीच मुलाचा दशक्रिया विधी करण्यात आला.
मुलाला सांगितले आई घ्यायला येईल…
रांजणगावमधीलच तीन तरुणांना या बापाचा मुलगा घाटी परिरात भीक मागताना दिसला. त्यांनी या बापाला घरी येऊन सांगितले, पण त्यांनी तर मुलाचा हार घातलेला फोटो दाखवला. मुलाचे वडील खोटे बोलत असल्याचे लक्षात आल्याने तरुणांनी ही गोष्ट शेजाऱ्यांना सांगितली. अखेर बापासमोर मुलाला आणून उभे केले असता बापाची भंबेरी उडाली आणि सर्व नाटक समोर आले. दरम्यान, या भोळसर मुलाला घरी आणायचे ठरवल्यानंतर त्याने नकार दिला होता. आई मला घेण्यासाठी येणार असल्याचे सांगत त्याने नकार दिला. मात्र खूप समजावून सांगितल्यानंतर तो घरी येण्यास तयार झाला.
इतर बातम्या-