औरंगाबादः तोंडोळी बलात्कार प्रकरण, रविवारी तिसरा आरोपी ताब्यात, उर्वरीत चार दरोडेखोरांचा शोध सुरू

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तोंडोळी येथे जाऊन पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला, त्यांना धीर दिला. पीडित महिलांचे समुपदेशन आणि पुनर्वसन करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. या महिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.

औरंगाबादः तोंडोळी बलात्कार प्रकरण, रविवारी तिसरा आरोपी ताब्यात, उर्वरीत चार दरोडेखोरांचा शोध सुरू
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 11:55 AM

औरंगाबादः पैठण तालुक्यातील तोंडोळी शेतवस्तीवरील दरोडा  (Tondoli Robbery)आणि सामुहिक बलात्कार प्रकरणाचा तपास अजूनही सुरुच आहे. या घटनेतील मुख्य आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराला शनिवारी अटक करण्यात आली होती. रविवारी या घटनेतील तिसऱ्या साथीदाराला पोलिसांनी (Aurangabad Police जेरबंद केले. ऊसतोड मजुराच्या वेषात जाऊन पोलिसांनी तिसरा आरोपी सोमनाथ बाबासाहेब राजपूत याला अटक केली. या प्रकरणात प्रभू श्याम पवार या मुख्य आरोपीसह विजय प्रल्हाद जाधव हे अन्य दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

45 दिवसात चार्जशीट दाखल करा- नीलम गोऱ्हे

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तोंडोळी येथे जाऊन पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला, त्यांना धीर दिला. पीडित महिलांचे समुपदेशन आणि पुनर्वसन करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. या महिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. आरोपींना जलद शिक्षा होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. पीडित महिलांना राष्ट्रीय व राज्याच्या मानवाधिकार आयोगाकडून मदत मिळवून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गृहमंत्र्यांची भेट घेऊन मी दरोडा, बलात्काराच्या अशा घटनांवर आळा घालण्यासाठी काही एसओपी करण्याच्या सूचना करणार आहे. या प्रकरणात तोंडोळीच्या प्रकरणात 45 दिवसांमध्ये चार्जशीट न्यायालयात दाखल करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आमदार अंबादास दानवे यांनी पीडितांना आर्थिक व रेशनची मदत केली असल्याचे त्या म्हणाल्या.

19 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दरोडा

पैठण तालुक्यातील बिडकीजवळील तोंडोळी येथील शेतवस्तीवर तीन महिन्यांपासून मध्य प्रदेशातील कुटुंब राहण्यास आले होते. यात तीन पुरुष व चार महिला होत्या. दरोडेखोरांनी 19 ऑक्टोबर रोजी मंगळवारी मध्यरात्री कुटुंबावर हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. दरोडेखोरांनी कुटुंबातील पुरुषांना बाजूच्या खोलीत हातपाय बांधून कोंडले, तर बाहेर एकाच्या गळ्याला चाकू लावून चारपैकी दोन महिलांवर चौघांनी सामूहिक अत्याचार केला. यातील पीडिता 31 आणि 32 वर्षीय असून, त्यांना दरोडोखोरांनी घराच्या बाजूला नेत अत्याचार केले. घरातील पुरुषांना शस्त्रांचा धाक दाखवून आधीच बांधून ठेवले होते त्यामुळे ते प्रतिकार करू शकले नाहीत. एकाने मुकाबला करण्याचा प्रयत्न केला असता त्याला गंभीर मारहाण करण्यात आली. तोंडोळी येथील या घटनेत दरोडेखोरांनी रोख 36 हजार आणि बनावट दागिने लंपास केले. तोंडोळी दरोड्यात दरोडेखोरांनी ज्या दोन महिलांवर बलात्कार केला, त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं. यापैकी एक महिला 15 दिवसांची बाळंतीण असल्याचे उघड झाले.

इतर बातम्या-

जे करायचं ते वेळेवर करू, औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरावरून किरीन रिजिजूंचे संकेत, अनेकांच्या भुवया उंचावल्या

गुन्हेगारांसह पीडितांचाच न्यायालयाशी संपर्क यायला हवा, हा गंड आपण दूर करण्याची गरज: सरन्यायाधीश रमण्णा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.