Aurangabad: ठाकरे स्मारकाच्या कामाची स्वतंत्र पाहणी करा, कोर्टाचे आदेश, प्रस्तावित नकाशा अव्यवहार्य असल्याचे निरीक्षण!
औरंगाबादः शहराचे ‘ग्रीन लंग्स’ अर्थात शहराचे फुप्फुस समजल्या जाणाऱ्या प्रियदर्शिनी (Priyadarshini Garden, Aurangabad) उद्यानातील वृक्षतोडीच्या आरोप प्रकरणी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी (Aurangabad Priyadarshini Garden) उद्यानातील प्रस्तावित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची दोन दिवसात पाहणी करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) तसेच वकिलांच्या त्रिसदस्यीय समितीने स्वतंत्ररित्या […]
औरंगाबादः शहराचे ‘ग्रीन लंग्स’ अर्थात शहराचे फुप्फुस समजल्या जाणाऱ्या प्रियदर्शिनी (Priyadarshini Garden, Aurangabad) उद्यानातील वृक्षतोडीच्या आरोप प्रकरणी कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी (Aurangabad Priyadarshini Garden) उद्यानातील प्रस्तावित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची दोन दिवसात पाहणी करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) तसेच वकिलांच्या त्रिसदस्यीय समितीने स्वतंत्ररित्या भेट देऊन पाहणी करून दोन दिवसात अहवाल सादर करावा तसेच विकासकामे जैसे थे ठेवावीत, असे आदेश खंडपीठातील न्यायमूर्ती रवींद्र घुदे, एस.जी. मेहरे यांनी दिले. स्मारकाच्या परिसराचा वास्तुविशारदाने तयार केलेला नकाशा प्रथमदर्शनी अव्यवहार्य वाटत असल्याचे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले.
नेमकी याचिका काय?
सिडकोतील प्रियदर्शनी उद्यान 2016 मध्ये सिडको प्रशासनाने महापालिकेकडे हस्तांतरीत केले. महापालिकेने उद्यानातील झाडे तोडून वृक्षांचे पुनर्रोपणही केले नाही. तेथे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक बनवण्याचा निर्णय झाल्यानंतर 2019 मध्ये योगेश बाळसाखरे व सोमनाथ कराळे यांनी अॅड. सनी खिवंसरा यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली होती. शहरातील ऑक्सिजनची गरज प्रियदर्शनी उद्यानामुळे पूर्ण होत असल्याचे याचिकेत म्हटले होते. महापालिकेने या उद्यानात नव्याने 10 कोटी निधीची तरतूद करून स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, म्युझियम, फूड कोर्ट आणि अँफी थिएटर उभारणीस प्रारंभ केला होता. खंडपीठाने जनसहयोग संस्थेमार्फत अहवाल मागवून बांधकामासंबंध ‘जैसे थे’ चे आदेश दिले होते.
शहरातला महत्त्वाचा ग्रीन झोन
इंटरनॅशनल सर्व्हे ऑफ इन्व्हायर्नमेंट संस्थेच्या सर्वेक्षणात उद्यान व परिसरात शहरातील इतर भागांच्या तुलनेत सर्वात कमी प्रदूषण असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र मनपाने उद्यानात नव्याने दहा कोटींचा निधी प्रस्तावित करून ठाकरे स्मारक, म्युझियम, फूड कोर्ट व एएमसी थिएटर उभारणीस प्रारंभ केला आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी पुन्हा खंडपीठात धाव घेत बांधकामाची छायाचित्रे निदर्शनास आणून दिली. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असून इतरत्र त्याचे पुनर्रोपणही केले जात नाही, असे आक्षेप नोंदवले.
इतर बातम्या-