औरंगाबादकरांनो 3 वर्ष धकवा कसंतरी, नव्या जलवाहनीसाठी प्रतीक्षाच!! जुन्या पाणी योजनेची 200 कोटींत डागडुजी होणार
नवी पाणीपुरवठा योजना (New Water scheme) अत्यंत संथ गतीत सुरु आहे. योजनेवर काम पाहणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीची सध्याची 2400 मिमी पाइपची उत्पादनक्षमता पाहता योजनेचं काम पुढील अडीच-तीन वर्षात पूर्ण होईल, अशी चिन्ह आहेत.
औरंगाबादः शहरात 1680 कोटी रुपये खर्च करून होत असलेली नवी पाणीपुरवठा योजना (New Water scheme) अत्यंत संथ गतीत सुरु आहे. योजनेवर काम पाहणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीची सध्याची 2400 मिमी पाइपची उत्पादनक्षमता पाहता योजनेचं काम पुढील अडीच-तीन वर्षात पूर्ण होईल, अशी चिन्ह आहेत. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जुनी 700 मिमी व्यासाची जलवाहिनीच बदलून त्या ठिकाणी तातडीने 800 मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्याची योजना आखण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी या योजनेला मंजुरी दिली. ही पाइपलाइन टाकण्यासाठी 200 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सभेनिमित्त औरंगाबादमध्ये होते. यावेळी त्यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रकर (Sunil Kendrekar) आणि मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्यासह अभियंत्यांची भेट घेतली आणि औरंगाबादमधील अडचणी समजून घेतल्या.
निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचा निर्णय
आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता शहरातील पेटलेला पाणी प्रश्न शिवसेनेला चांगलाच भोवणार असल्याची चिन्ह आहेत. शहरातील नागरिकांना आठ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होतो. त्यातही वीजपुरवठा खंडित झाला अथवा जीर्ण झालेल्या जुन्या जलवाहिनीत बिघाड झाल्यास हे वेळापत्रकही कोलमडून जातं. वर्षानुवर्षांपासून हा प्रश्व झेलणाऱ्या औरंगाबादकरांचा आता संताप होत आहे. हाच मुद्दा उचलून धरत भाजपच्या वतीनं शहरात मोठा जलाक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे शिवसेनेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहरातील नवी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास येईपर्यंत जुन्याच योजनेच्या मलमपट्टीसाठी 200 कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.
जुन्या योजनेत काय दुरुस्ती करणार?
- – जुन्या जलवाहिनीवर 200 कोटी रुपयांचा खर्च कण्यात येणार आहे.
- यात 700 मिमीचे पाईप बदलून ते 800ते 1 हजार मिमीचे पाइप तातडीने लावण्यात येतील.
- जुन्या योजनेतील पाइप बदलण्याचं काम येत्या 06 महिन्यात पूर्ण होईल, असं योजनेनुसार अपेक्षित आहे.
- दररोज 56 एमएलडीची क्षमता असूनही जुन्या योजनेतून फक्त 30 एमएलडी पाणी येते. यातील 15 किलोमीटरचा पाइप गळत आहे.
- ही एवढी पाइप लाइन नवी टाकली जाईल. यामुळे 26 एमएलडी पाणी वाढू शकते.
- ढोरकीन येथील पंप बदलून जलशुद्धीकरण संचाचे नूतनीकरणही करावे लागेल. यासंदर्भातील योजनेचा आराखडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या सूचनेनुसार जीवन प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे