Aurangabad | शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपातर्फे उपायुक्तांची नियुक्ती, आता तरी प्रश्न सुटणार का?

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची आढावा बैठक घेतली. यात संतोष टेंगळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यासंदर्भात टेंगळे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात असून नागरिकांना समान चार दिवसाआड पाणी देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे.

Aurangabad | शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपातर्फे उपायुक्तांची नियुक्ती, आता तरी प्रश्न सुटणार का?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 9:11 AM

औरंगाबादः उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील पाणी प्रश्न (Water Supply Problem) गंभीर बनला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकांनी (AMC Administrator) आता पाणीपुरवठ्यातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी उपायुक्तांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत या विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यावर होती. हा विभाग आता उपायुक्त संतोष टेंगळे (Santosh Tengle) यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. शहरातील अनेक भागात कुठे चार तर कुठे सात किंवा नऊ दिवसांनी पाणीपुरवठा सुरु होता. उन्हाळा सुरु झाल्यापासून तर पुरवठा प्रचंड विस्कळीत झाला आहे. आता उपायुक्त या प्रश्नावर कसे मार्ग काढतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदोलकांचे लक्ष मनपाच्या नियोजनाकडे

उन्हाळा सुरु होताच अनेक भागात अघोषित लोडशेडिंगदेखील सुरु झाले. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाण्याचा दिवस असूनही वीजपुरवठ्याअभावी पाणी मिळाले नाही. सिडको-हाडकोसह अनेक भागात सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्यासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर मनपा आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी 15 कलमी कार्यक्रमही घोषित केला. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाला स्वतंत्र उपायुक्त नेमला जाईल, असे सांगण्यात आले होते. आता उपायुक्तांवर जबाबदारी देण्यात आली आहे. उपायुक्त यातून कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चार दिवसाआड पाणी देण्याचे उद्दिष्ट

शहरातील जुनी पाणीपुरवठा वाहिनी अत्यंत जीर्ण अवस्थेत अससल्यामुळे वारंवार पाणीपुरवठ्यात अडथळे येतात. त्यात कधी वीजपुरवठा खंडित होतो तर कधी वीजपुरवठा करणाऱ्या पॅनलमध्ये बिघाड होतो. पाइपलाइन फुटल्यानेही पाणीपुरवठा विस्कळीत होतो. ही संकटांची मालिका थांबली तरच शहराला नियोजनानुसार पाणीपुरवठा करता येणार आहे. त्यानंतर शहरात सर्वत्र एकसमान सूत्राप्रमाणे चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची आढावा बैठक घेतली. यात संतोष टेंगळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यासंदर्भात टेंगळे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात असून नागरिकांना समान चार दिवसाआड पाणी देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.