Aurangabad election: औरंगाबाद जिल्हा परिषद गट व गणांच्या पुनर्रचनेची यादी सोशल मीडियावर, चर्चांना उधाण
एका जिल्हा परिषद मतदार संघात किमान 31 हजार मतदार अपेक्षित धरून नवीन गटांची पुनर्रचना करायची आहे. 2011 ची जनगणना व त्यानंतर होणारी मतदारांची अपेक्षित वाढ धरल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हा परिषदेत 8 नव्या जिल्हा परिषद मतदार संघाची भर पडणार आहे.
औरंगाबादः औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत मार्च 2022 मध्ये संपत आहे. त्याआधी जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांची पुनर्रचना करण्याचे काम सुरु आहे. जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी हे काम पूर्ण झाले नसल्याचे सांगत आहेत. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण अधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या पुनर्रचनेचे तक्ते राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आपापल्या गट आणि गणात घेऊन मिरवत आहेत. सोशल मीडियावरही या याद्या फिरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात अनेक चर्चांना उधाण येत आहे.
नव्या आराखड्यात काय बदल?
एका जिल्हा परिषद मतदार संघात किमान 31 हजार मतदार अपेक्षित गृहित धरून नवीन गटांची पुनर्रचना करायची आहे. 2011 ची जनगणना व त्यानंतर होणारी मतदारांची अपेक्षित वाढ धरल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हा परिषदेत 8 नव्या जिल्हा परिषद मतदार संघाची भर पडणार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेत 62 गट आणि पंचायत समितीचे 122 गण आहेत. मात्र पुनर्रचना झाल्यानंतर 70 गट आणि 140 गणांमध्ये निवडणुका होणार आहेत. महसूल विभागाला नव्याने निवडणूका होणार आहेत. त्यामुळे नवीन पुनर्रचनेत वडगाव कोल्हाटी, गेवराई ब्रुकब्राँड, पिंप्रीबु, चौका, लाडसावंगी, सावंगी, करमाड, गोलटगाव आणि तिसगाव गट दाखवण्यात आला आहे.
औरंगाबाद तालुक्यात काय बदल?
औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत मार्च 2022 मध्ये संपत आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निवडणुका होण्याची अपेक्षा आहे. नव्याने होणाऱ्या रचनेत औरंगाबाद तालुक्यात दहा जिल्हा परिषद गट व वीस पंचायत समिती गण असतील.
इतर बातम्या-