औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला, 8 दिवसात शून्यावरून 6 पर्यंत, शुक्रवारचा संसर्गाचा आकडा काय सांगतो?

शहरातील 10 रुग्णांची तपासणी केली असता, त्यापैकी 6 रुग्णांना कोव्हिडचा संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात 151 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले.

औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला, 8 दिवसात शून्यावरून 6 पर्यंत, शुक्रवारचा संसर्गाचा आकडा काय सांगतो?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 9:48 AM

औंरगाबद: राज्यातील कोरोना रुग्णांचे आकडे ज्या वेगाने वाढतायत, तोच वेग औरंगाबादमध्येही (Aurangabad corona) दिसून येत आहे. औरंगाबादचा शुक्रवारचा पॉझिटिव्हिटी रेट 6.29 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच शहरातील 10 रुग्णांची तपासणी केली असता, त्यापैकी 6 रुग्णांना कोव्हिडचा संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे. शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात 151 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शहरात समूह संसर्ग होऊ नये, यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केली जात आहे.

आठ दिवसात पॉझिटिव्हिटी रेट 6 टक्क्यांवर

शहरातील पॉझिटिव्हिटी रेट आठ दिवसात शून्यावरून सहा टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून आले आहे. 31 डिसेंबर- 0.91 1 जानेवारी- 0.73 02 जानेवारी-1.34 03 जानेवारी- 1.21 04 जानेवारी-3.76 05 जानेवारी- 4.23 06 जानेवारी- 5.28 07 जानेवारी-6.29

संकटासाठी महापालिकेची तयारी काय?

– महापालिकेने 750 ऑक्सिजन बेड तयार केले आहेत. – दुसऱ्या लाटेत 7 ते 8 हजार रुग्णांवर एकाच वेळी उपचार केले जातील, एवढी महापालिकेची क्षमता होती. आता ही क्षमता 10 हजार रुग्णांपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. – सध्या शहरात 300 सक्रिय रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. – त्यामुळे किलेअर्क, एमआयटी कॉलेजची दोन वसतीगृहे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह, देवगिरी महाविद्यालयाचे वसतीगृह, आयएचएम कॉलेजचे वसतीगृह या पाच ठिकाणी सोमवारपासून कोविड सेंटर्स सुरु केले जातील.

खासगी डॉक्टरांना इशारा

कोविडची रुग्णसंख्या वाढत असली तरीही रुग्णांमध्ये आढळून येणारी लक्षणे सौम्य आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांनीही गरज नसताना रुग्णाला दाखल करून घेतले तर कडक कारवाई केली जाईल. बेड विनाकारकण अडवून ठेवल्या जाणार नाहीत, अशी दक्षता घ्यावी. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करून घ्यायला हवे, अशा सूचना खासगी डॉक्टरांना देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या-

Mumbai | लॉकडाऊनच्या भीतीमुळे परप्रांतीय मजुरांची LTT टर्मिनसवर गर्दी? रेल्वे पोलिसांनी काय सांगितलं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.