Beed | धावत्या दुचाकीवरून जाताना मित्राचा खून, बहिणीशी संबंध असल्याचा राग, बीडमध्ये रक्तरंजित हत्याकांड!
ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बीड ग्रामीण पोलिसांनी तत्काळ तपास सुरु करत सिद्धेश्वर बहिरवाळ याला केजमध्ये 23 मे रोजी दुपारी 12 वाजता पकडलं.
बीडः मित्राचे आणि बहिणीचे सूत जुळल्याचा संशय आल्याने त्याचा बदला मित्रानेच घेतल्याची थरारक घटना बीडमध्ये घडली. गंभीर बाब म्हणजे धावत्या दुचाकीवरून जात असताना अंधारात चाकूने सपासप वार करून ही हत्या (Murder) केली. 22 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील मंझेरी (Manzwri) शिवारातील शांतीवनजवळ हा प्रकार घडला. या हत्येनंतर त्याच दुचाकीवरून पळून गेलेल्या मारेकऱ्याला बीड ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) 14 तासांनंतर जेरबंद केलं. 23 मे रोजी घटना उघडकीस आल्यानंतर बीड तालुक्यात एकच खळबळ माजली.
मित्रावरच सपासप वार
या घटनेविषयी पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, बीड तालुक्यात ब्रह्मदेव हनुमान कदम (26, रा. मंझेरी. ता. बीड) असे मृताचे नाव आहे. तो अविवाहित असून शेती करत होता. गावातलाच सिद्धेश्वर ऊर्फ लक्ष्मण पांडुरंग बहिरवाळ (रा. मंझेरी, ता. बीड) हा त्याचा मित्र आहे. सिद्धेश्वरची बहीण सासरी नांदत नसल्याने ती माहेरीच असते. ब्रह्मदेव आणि सिद्धेश्वर हे दोघे मित्र असल्याने एकमेकांच्या घरी येणे-जाणे असायचे. यातून सिद्धेश्वरची बहीण आणि ब्रह्मदेवाचा सूत जुळले. त्यांच्या प्रेम प्रकरणाची भणक सिद्धेश्वरला लागली ोती. तेव्हापासून त्याच्या मनात ब्रह्मदेवविषयी राग होता.
22 मे रोजी रात्री काय घडलं?
22 मे च्या रात्री साडेनाऊ वाजता ब्रह्मदेव हा समाधान भंडाणे आणि बबन बहिरवाळ यांच्यासोबत जेवणासाठी मंझेरी फाट्यावर गेला होता. काही मिनिटांनी सिद्धेश्वर तेथे पोहोचला. त्यानंतर तिघे दोन दुचाकीवरून गावी जाण्यास निघाले. समाधान भंडाणे व बबन बहिरवाळ एका दुचाकीवर तर ब्रह्मदेव कदम आणि सिद्धेश्वर बहिरवाळ दुसऱ्या दुचाकीवर निघाले. ब्रह्मदेव दुचाकी चालवित होता, तर सिद्धेश्वर मागे बसला होता. शांतिवनजवळील चढावर गाडी असताना सिद्धेश्वरने ब्रह्मदेवच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बीड ग्रामीण पोलिसांनी तत्काळ तपास सुरु करत सिद्धेश्वर बहिरवाळ याला केजमध्ये 23 मे रोजी दुपारी 12 वाजता पकडलं.