AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय देशमुख यांनी घेतली जरांगेंची भेट, तर सुरेश धस अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; सरपंच हत्या प्रकरणी मोठ्या घडामोडी

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण आले आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आमदार सुरेश धस मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत. सीआयडीने वाल्मिकी कराडचा शोध सुरू आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी सीआयडीची पथके केरळ आणि कर्नाटकात आहेत.

धनंजय देशमुख यांनी घेतली जरांगेंची भेट, तर सुरेश धस अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; सरपंच हत्या प्रकरणी मोठ्या घडामोडी
suresh dhasImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 31, 2024 | 11:18 AM
Share

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज जालन्यात अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये सुमारे अर्धा ते तासभर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. देशमुख हे अंतरवलीकडे गेलेले असतानाच दुसरीकडे आमदार सुरेश धस हे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. तर, सीआयडीचे पथक वाल्मिकी कराडचा बीडमध्ये शोध घेत आहे.

मस्साजोगचे सरपंच मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांनी भेट घेतली. धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे बराच वेळ चर्चा झाली. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय देशमुख हे प्रथमच अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कानावर सर्व प्रकार टाकला. आपल्या भावाचे मारेकरी अद्यापही मोकाट असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावर आरोपींना कुठपर्यंत अटक होत नाही ते आपण पाहू. हे लोक आपल्याला फक्त घुमवतात का तेही पाहू. जर काहीच होत नसेल तर आपल्याकडे जनतेचं शस्त्र आहे. जनतेच्या न्यायालयात जाऊन आपण दाद मागू, असं मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय यांना सांगितलं. धनंजय देशमुख यांचा सीआयडीने जबाब नोंदवला होता. धनंजय यांना नोटीस बजावून सीआयडीने बोलावलं होतं. त्यानंतर आज धनंजय यांनी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली.

धस आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

भाजपा आमदार सुरेश धस मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज दुपारी 1 वाजता सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सपत्नीक श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान येथे जाणार आहेत. त्या संदर्भात धस हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी येणार असून यावेळी मतदारसंघातील विकास कामांवरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या भेटीत धस हे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून तपासात दिरंगाई केली जात असल्याचा धस यांनी आरोप केला आहे. तीन आठवडे झाले तरी आरोपी अजून फरार आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांची भावनाही या प्रकरणी तीव्र आहे. या सर्व गोष्टी धस मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहेत. तसेच या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणीही धस करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

केरळ आणि कर्नाटकात पथकं

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. या हत्याप्रकरणात फक्त चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने 9 पथके तयार केली आहेत. या पथकात 150 कर्मचारी- अधिकारी तैनात आहेत. यातील दोन पथके केरळ आणि कर्नाटकात रवाना झाली आहेत. या प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अद्यापही फरार आहे. तो महाराष्ट्रातच असल्याचं सांगितलं जात आहे. कराड याच्या संपर्कातील एकूण 145 जणांची आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे. सीआयडीचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी ही चौकशी केली आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.