मुख्यमंत्री साहेब, नंतर तुम्हाला पश्चात्ताप होईल; मोर्चाच्या आधीच मनोज जरांगे यांचा सूचक इशारा

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अद्याप पकडले नसल्याने बीडमध्ये विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटील या मोर्चात सहभाही होणार आहेत. या मोर्चा पूर्वी मनोज जरांगे यांनी सूचक इशारा दिला आहे. मोर्चाच्या निमित्ताने मस्साजोग गावात बंद पुकारण्यात आला आहे.

मुख्यमंत्री साहेब, नंतर तुम्हाला पश्चात्ताप होईल; मोर्चाच्या आधीच मनोज जरांगे यांचा सूचक इशारा
manoj jarange patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 28, 2024 | 9:49 AM

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना अद्यापही पकडण्यात आलं नसल्याने त्याचा निषेध म्हणून आज बीडमध्ये विराट मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाच्या निमित्ताने संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावात कडकडीत बंद पुकारण्यात येणार आहे. तसेच गावातील एकूण एक व्यक्ती मोर्चात सहभागी होणार आहे. मनोज जरांगे पाटील हे सुद्धा या मोर्चात सहभागी होणार असून मोर्चात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचक इशारा दिला आहे. आरोपींना पाठिशी घालणाऱ्यांना पाठी घालू नका, पश्चात्ताप होईल, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. इतके दिवस झाले आरोपीला पकडले जात नाही. आरोपीला वाचवणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. खरंतर आरोपींना वाचवणाऱ्यांना तुम्ही सज्जड दम दिला पाहिजे. संध्याकाळपर्यंत आरोपी हजर झाले पाहिजे. नाही तर तुझी खैर नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. पण मुख्यमंत्री तसं करत नाही. संतोष देशमुख यांचा खून झाला. त्याचं कुणाला काही पडलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीचा खून झाला असता तर तुम्हाला झोप लागली असती का? मग तुम्हाला देशमुख यांच्या पत्नीचा भयंकर आक्रोश ऐकू का येत नाही? असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.

आईचा आक्रोश दिसत नाही का?

संतोष देशमुख यांच्या लेकीचा आक्रोश आहे. आईचा आक्रोश आहे. तुम्हाला हा आक्रोश दिसत नाही का? तुम्ही आरोपींना पकडत नाही. वातावरण थंड होण्याची वाट पाहात आहात. तुम्हीच आरोपींना पकडून ठेवलं की काय असं वाटत आहे. पण आम्ही वातावरण थंड होऊ देणार नाही. हे वातावरण आता राज्यभर पसरेल. प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही मोर्चे काढणार आहोत, असं मनोज जरांगे यांनी सांगतिलं.

बिमोड करणं तुमचं काम

बीडमध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. काही लोक बंदूका बाळगत आहेत. बंदुकीच्या जोरावर शिवीगाळ करत आहेत. जमिनी बळकावत आहेत. त्यांचा बिमोड करणं हे तुमचं काम आहे. पण तुम्हीच त्यांना सांभाळताना दिसत आहात. मुख्यमंत्र्यांनी या लोकांना सांभाळू नका. साहेब, तुम्ही या लोकांना सांभाळू नका. पाठिशी घालू नका. नाही तर तुम्हाला नंतर पश्चात्ताप होईल. हेच लोक एक दिवस वर टांग करतील. तेव्हा या लोकांना तेव्हाच संपवलं असतं तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटेल, असंही त्यांनी म्हटलं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.