Vaccination: बोगस प्रमाणपत्र देणारे आणखी एक रॅकेट औरंगाबादेत उघड, ओम्नी व्हॅनमध्ये फसवेगिरीचा कारखाना!

औरंगाबादः लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने सर्वत्र लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती केल्यानंतर जिल्ह्यात बोगस लस प्रमाणपत्र (Bogus vaccination certificate) तयार करून देणारे सक्रीय झाले. काही दिवसांपूर्वीच शहरातील सरकारी डॉक्टरच्या मदतीने सुरु असलेला हा प्रकार उघडकीस आला होता. आता असे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या दोन आरटीओ एंजटनाही पोलिसांनी जाळ्यात अडकवले. या दोघांवर कारवाई झाल्यानंतर असे आणखीही […]

Vaccination: बोगस प्रमाणपत्र देणारे आणखी एक रॅकेट औरंगाबादेत उघड, ओम्नी व्हॅनमध्ये फसवेगिरीचा कारखाना!
बोगस लसीकरणाती आरोपी
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 12:27 PM

औरंगाबादः लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने सर्वत्र लसीकरण प्रमाणपत्राची सक्ती केल्यानंतर जिल्ह्यात बोगस लस प्रमाणपत्र (Bogus vaccination certificate) तयार करून देणारे सक्रीय झाले. काही दिवसांपूर्वीच शहरातील सरकारी डॉक्टरच्या मदतीने सुरु असलेला हा प्रकार उघडकीस आला होता. आता असे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या दोन आरटीओ एंजटनाही पोलिसांनी जाळ्यात अडकवले. या दोघांवर कारवाई झाल्यानंतर असे आणखीही एजंट लसीकरण प्रमाणपत्रांचा कारखाना उघडून बसले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शहरात हजारो खोटे प्रमाणपत्र वाटप झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ओम्नी व्हॅनमध्ये बोगसगिरीचा कारखाना

जिन्सीतील डॉक्टरांनी बोगस नोंदणी करून प्रमाणपत्र दिल्याची घटना उघडकीस आल्यानंतर दोनच दिवसात पुन्हा तशीच टोळी समोर आली. त्यामुळे हजारो बोगस प्रमाणपत्र वाटप झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना गुरुवारी रेल्वेस्टेशन रस्त्यावरील आरटीओ कार्यालयासमोर ओम्नी व्हॅनमध्ये कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र एडिट करून अवघ्या 200 ते 500 रुपयांत विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. ओम्नी व्हॅनमधून लाकडी टेबल, दोन लॅपटॉप, इन्व्हर्टर, प्रिंटर जप्त करण्यात आले.

खऱ्या प्रमाणपत्राच्या नावात एडिटिंग

पोलिसांनी या प्रकरणी अदनान उल्ला मुजीब बेग आणि शेख मिनाजउद्दीन शेख अश्फाकउद्दीन या दोघांना पकडले. आरोपीकडील लॅपटॉपवर पीडीएफ स्वरुपात कोरोना लसीकरणाचे एक खरे प्रमाणपत्र होते. गुगलवरून पीडीएफ कव्हर्टरच्या मदतीने पीडीएफ फाइल वर्ड फाइलमध्ये रुपांतरीत करयाची. मूळ नाव खोडून त्यात ग्राहकाचे नाव , आधार क्रमांक टाकून त्याची प्रिंट काढली जात होती. असे प्रकार गेल्या काही दिवसात अनेक आरटीओ एजंट करत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. मात्र या दोघांवर कारवाई केल्यानंतर इतर लोक फरार झाले.

इतर बातम्या-

Aurangabad: सावत्र बापानं सांगितलं मुलगा कोरोनानं गेला, इकडे कॉलनीतल्या तरुणांना काय दिसलं?

राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे, पण निधी मिळण्यात सर्वात मागे; सर्वाधिक निधी कुणाला?

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.