Children Vaccination: 15 वर्षांवरील मुलांना आजपासून लसीकरण, औरंगाबाद शहरात कोणत्या केंद्रांवर लस?
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु होत आहे.
राज्य शासनाने 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत आजपासून म्हणजेच सोमवारी 3 जानेवारीपासून या लसीकरणाला सुरुवात होत आहे. शहरात एकूण चार आरोग्य केंद्रांवर ही लस दिली जाईल, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
कोविन आणि केंद्रांवर दोन्हीकडे नोंदणी
मुलांच्या लसीकरणासाठी कोविन अॅपवर नोंदणी करण्याची व्यवस्था महापालिकेकडून केली जात आहे. कोविन अॅपवर नोंदणी न करता लसीकरण केंद्रावर मुले आली तर त्यांनाही तिथेच नोंदणी करून लस दिली जाईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
कोणती लस, केंद्र कोणते?
15 ते 18 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणासाठी महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. या मुलांच्या लसीकरणासाठी शहरात चार ठिकाणी केंद्र ठरवण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे- – क्रांती चौक आरोग्य केंद्र – राज नगर आरोग्य केंद्र – सिडको- एन-4 मधील एमआयटी हॉस्पिटल – मेल्ट्रॉन रुग्णालयातील केंद्रांवर हे लसीकरण होईल. – शहानूरमिया दर्गा परिसरातील मयूरबन कॉलनीतील प्रियदर्शिनी शाळा आणि हडकोतील एसबीओए शाळेतही लसीकरण सत्र घेतले जाईल.
इतर बातम्या-