औरंगाबादकरांनो, आरोग्य सांभाळा, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पन्नाशीच्या दिशेने, वाचा शहरासह मराठवाड्याचे Updates!

औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा औरंगबाद शहर (Aurangabad city) आणि जिल्ह्याला घट्ट विळखा पडल्याचे चित्र आहे. कोरोनाची तिसरी लाट दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. रविवारी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट चक्क 48.27 टक्क्यांपर्यंत पोहोचला. रविवारी दिवसभरात तब्बल 779 बाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहराचा पॉझिटिव्हिटी रेट (Corona positivity rate) 44 पर्यंत पोहोचला होता. मात्र आता […]

औरंगाबादकरांनो, आरोग्य सांभाळा, कोरोना पॉझिटिव्हिटी रेट पन्नाशीच्या दिशेने, वाचा शहरासह मराठवाड्याचे Updates!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 10:40 AM

औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा औरंगबाद शहर (Aurangabad city) आणि जिल्ह्याला घट्ट विळखा पडल्याचे चित्र आहे. कोरोनाची तिसरी लाट दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. रविवारी शहराचा पॉझिटिव्हिटी रेट चक्क 48.27 टक्क्यांपर्यंत पोहोचला. रविवारी दिवसभरात तब्बल 779 बाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहराचा पॉझिटिव्हिटी रेट (Corona positivity rate) 44 पर्यंत पोहोचला होता. मात्र आता तो पन्नाशीच्या दिशेने वाटचाल करतोय. 100 रुग्णांमध्ये सध्या जवळपास 49 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. या वाढलेल्या संसर्गामुळे प्रशासनाचीही झोप उडाली आहे.

कोणत्या वयोगटात जास्त संसर्ग?

तिसऱ्या लाटेतील बाधितांचा वयोगट पाहिल्यास 19 ते 50 वयोगटातील नागरिकांना सर्वात जास्त प्रमाणात कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. रविवारच्या बाधितांच्या संख्येत या वयोगटातील 528 लोक दिसून आले. तर 50 पेक्षा जास्त वय असलेल्या 188 जणांचा यात समावेश झाला. त्यानंतर 6 ते 14 वर्षे वय असलेल्या 29 रुग्णांचा समावेश दिसून आला.

95 टक्के रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी

दरम्यान, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्या पद्धतीने रुग्णांना त्रास होत होता, तसा आता नाही. त्यामुळे सरकारच्या निर्देशांनुसार, 95 टक्के रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी देण्यात आली आहे. मनपाकडून रुग्ण ट्रेस करणे कमी झाले असून स्वतःहून जे नागरिक येत आहेत, त्यांचीच तपासणी केली जात आहे. रविवारी दिसवभरात 1,618 जणांची कोरोना तपासणी झाली. त्यातील 779 जण बाधित असल्याचे समोर आले.

मराठवाड्यात काय स्थिती?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव संपूर्ण मराठवाड्यावर दिसून येत आहे. मागील आठवडाभरापासून दररोज चार हजारांवर रुग्ण आढळत आहेत. मागील 24 तासात मराठवाड्यात 4291 नवे रुग्ण आढळले आहेत. औरंगाबाद आणि बीडमध्ये प्रत्येकी दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यात रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- औरंगाबाद- 1224 जालना- 442 परभणी-257 नांदेड-786 हिंगोली-165 बीड- 290 लातूर- 771 उस्मानाबाद- 351

इतर बातम्या-

राज्यस्तरीय हळद परिषदेत कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी महत्वपूर्ण सल्ला, वाचा सविस्तर

Napgur Accident | पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात, तीन वाहनं एकमेकांवर आदळली, 5 जणांचा जागीच मृत्यू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.