औरंगाबाद: सायबर गुन्ह्यांच्या तपासाला वेग मिळणार, छावणीत सायबर क्राइम विभाग सुरू
औरंगाबादः छावणीतील न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळा अर्थात फॉरेन्सिक लॅबमध्ये (Forensic Lab) नुकताच सायबर क्राइम विभाग (Cyber crime department) सुरु करण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद, (Aurangabad) जालना, उस्मानाबाद आणि बीड हे चार जिल्हे या विभागाला जोडण्यात आले आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची कमी वेळात उकल करणे सोपे होणार आहे. सायबर गुन्ह्यांचे वाढले प्रमाण सध्या अनेक ठिकाणी सायबर […]
औरंगाबादः छावणीतील न्याय सहाय्यक वैद्यकीय प्रयोगशाळा अर्थात फॉरेन्सिक लॅबमध्ये (Forensic Lab) नुकताच सायबर क्राइम विभाग (Cyber crime department) सुरु करण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद, (Aurangabad) जालना, उस्मानाबाद आणि बीड हे चार जिल्हे या विभागाला जोडण्यात आले आहेत. त्यामुळे सायबर गुन्ह्यांची कमी वेळात उकल करणे सोपे होणार आहे.
सायबर गुन्ह्यांचे वाढले प्रमाण
सध्या अनेक ठिकाणी सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. बँकेतून बोलत असल्याचे सांगून बोगस कॉल करून गंडा घालणे, फेसबुक व व्हॉट्सअपसारख्या समाज माध्यमातून महिलांची बदनामी करणे, नोकऱ्यांच्या बोगस संकेतस्थळांवरून बेरोजगारांची फसवणूक करणे आदी सायबर गुन्हे वाढत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांचा स्वतंत्र सायबर गुन्हे विभाग सुरु करण्यात आला आहे. मात्र कुशल मनुष्यबळ नसल्याने या तपासात विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर फॉरेन्सिक लॅबमध्ये सायबर क्राइम विभाग सुरु झाल्याने पोलिसांनाही मोठी मदत मिळणार आहे. फॉरेन्सिक लॅबचे उपसंचालक आर. आर. मावळे यांच्या हस्ते नुकतेच सायबर क्राइम विभागाचे उद्घाटन करण्यात आले.
2018 मध्ये विभागाला मान्यता
फॉरेन्सिक लॅबमध्ये सायबर क्राइम विभाग सुरु करण्यास गृह विभागाने 2018 रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर 1 सप्टेंबर 2021 रोजी वैज्ञानिक लॅब विभागाचे गट ब संवर्गातील पदे उपलब्ध झाली. फॉरेन्सिक लॅब विभागाचे महासंचालक संदीप बिश्नोईस प्रभारी संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच ही लॅब सुरु करण्यात आली आहे. तसेच सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे.
तंत्रशुद्ध पद्धतीने तपासणी
या ऑरेन्सिक लॅबच्या सायबर क्राइम विभागात संगणक, मोबाइलचा वापर करून केलेल्या सायबर गुन्ह्यांची उकल केली जाईल. यात व्हिडिओचित्रण व ध्वनीफितींची तपासणीदेखील केली जाईल, अशी माहिती विभागाचे उपसंचालक आर. आर. मावळे यांनी दिली.
इतर बातम्या-
शॉपिंग साईटवर फ्रीजची जाहिरात टाकणं महागात, पिंपरीच्या महिलेची 50 हजारांना फसवणूक
महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आक्षेपार्ह लिखाण, ‘लखोबा लोखंडे’ पुणे सायबर पोलिसांच्या कचाट्यात