माझं घर जाळण्याचा डाव, सोशल मीडियावरील ‘त्या’ पोस्टचा धनंजय मुंडे यांच्याकडून उल्लेख

मी 80 वर्षाची आहे. माझ्या डोळ्या देखत अजितदादा मुख्यमंत्री झालेले मला पाहायचं आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली. त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपलं मुल मोठं व्हावं हे कुणाच्याही आईला वाटतं. त्यात काही वावगं नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

माझं घर जाळण्याचा डाव, सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टचा धनंजय मुंडे यांच्याकडून उल्लेख
dhananjay mundeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 7:40 PM

महेंद्र मुधोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड | 5 नोव्हेंबर 2023 : बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमधील हिंसाचारानंतरच्या परिस्थितीची पाहणी केली. यानंतर त्यांनी बीड हिंसाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मगाणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. बीडच्या हल्ल्यामागे मोठं षडयंत्र होतं. एकाचवेळी अनेक ठिकाणी ठरवून जाळपोळ करण्यात आली, असं सांगतानाच स्वातंत्र्य सैनिकांनीही कधी ब्रिटीशांची घरे जाळली नव्हती, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. तसेच माझं घर जाळण्याची सोशल मीडियावरही चर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये ज्या भागात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला त्या भागाची पाहणी केली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याचीही पाहणी केली. तसेच पोलिसांशी चर्चा करून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले. यावेळी त्यांनी बीडच्या घटनेचा जाहीर निषेधही नोंदवला. अर्थाचा अनर्थ काढून वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. प्रकाशदादा सोळंके स्वत: मराठा समाजातील आहेत. तरीही त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.

माझं घर जाळायचं, जाळा

माजलगाव आणि बीडमधील अंतर अधिक आहे. तरीही माजलगावमध्ये येऊन हल्ले झाले. प्रकाश सोळंके यांचं घर पेटवलं गेलं. याचा अर्थ हा हल्ला पूर्वनियोजीत होता, असं सांगतानाच घरं जाळून कधी आरक्षण मिळतं का? माझंही घर जाळण्याची सोशल मीडियावर चर्चा आहे, अशी धक्कादायक माहिती त्यांनी दिली. बीड जाळलं आता परळी जाळा असा मेसेज सोशल मीडियावर होत आहे. माझं घर जाळायचयं जाळा, त्याने आरक्षण मिळणार आहे का? असा सवाल त्यांनी केला.

पेट्रोल बॉम्बचा वापर

बीडच्या हिंसाचाराचा तपास एसआयटीकडून झाला पाहिजे. त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. घरांना नंबर देऊन हल्ले करण्यात आले. पेट्रोल बॉम्बने घर, कार्यालये आणि व्यवसायाची ठिकाणे जाळण्याचा प्रयत्न झाला. हे भयंकर आहे. याची माहिती मी मुख्यमंत्र्यांना देणार आहे, असं मुंडे यांनी सांगितलं.

बीड पेटलं आता महाराष्ट्र पेटणार

बीड पेटलं आता महाराष्ट्र पेटणार, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. ज्याने कोणी हे केलं त्याला प्रशासन शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. हिंसाचार एवढा वाढला की पोलिसांनाही समन्वय साधता आला नाही. या हिंसाचारात ठरवून घरे जाळण्यात आली. ज्यांनी कधीच मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, त्यांचीही घरे जाळल्या गेली. मराठा नेत्यांचीही घरे जाळण्यात आली. या घटनेचा पोलिसांनी तपास केला आहे. पण एसआयटीकडून याचा तपास होण्याची गरज आहे. अनेक नेत्यांनी ही मागणी केली आहे, असंही ते म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.