AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायकः दहा रुपयांसाठी कुणी जीव जाईपर्यंत मारतं का? काय घडलं औरंगाबादेत?

रिक्षा चालक आणि प्रवासी या दोघांमध्ये दहा रुपयांवरून सुरु झालेला वाद मोठ्या विकोपाला गेल्याची घटना औरंगाबादेत नुकतीच घडली. वादाचे भांडणात आणि भांडणाचे मारहाणीत रुपांतर झाले अन् यात एकाला गंभीर जखम होऊन त्याचा मृत्यू झाला.

धक्कादायकः दहा रुपयांसाठी कुणी जीव जाईपर्यंत मारतं का? काय घडलं औरंगाबादेत?
मारहाणीत मृत मुजफ्फर आणि आरोपी रिक्षा चालक सालम
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 9:29 AM
Share

औरंगाबादः दहा रुपयांच्या वादासाठी कुणी एखाद्याच्या जीवावर उठू शकतं, ही कल्पनाही केली जात नाही. पण औरंगबादमध्ये अशी घटना (Crime) घडली. रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यात दहा रुपयांवरून वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. दोघांमध्ये बाचाबाची, मारहाण झाली. या प्रवासी गंभीर जखमी झाला. शहरातील सिटी चौक पोलिसात (Aurangabad police) या घटनेची नोंद झाली आहे.

काय घडलं नेमकं?

पैठण तालुक्यातील कवडगाव येथून मंगळवारी मुजफ्फर हे सालमच्या रिक्षात बसले. मुजफ्फर हेदेखील रिक्षाचालक आहेत. सिटी चौकात गेल्यानंतर मुजफ्फर यांनी थोडे पुढे सोडण्यास सांगितले. सालम यांनी सोडलेही, पण ठरलेल्या भाड्यापेक्षा 20 रुपये जास्त मागितले. त्यावरून मीसुद्धा ऑटोचालक आहे, दहाच रुपये देणार, असे म्हणताच त्यांच्यात वाद सुरु झाला. दोघांमध्ये हाणामारी झाली. यात सालमने मुजफ्फर यांच्या नाकावर जोरात ठोसा मारला. यामुळे मुजफ्फर यांच्या नाकातून रक्तस्सराव सुरु झाला.

रक्तबंबाळ अवस्थेत गाठले ठाणे

संतापलेल्या मुजफ्फर यांनी थेट सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दिली. तोपर्यंत त्यांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले होते. पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन त्यांना घाटीत पाठवले. मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला. नाकावर मार लागून घोळाणा फुटल्याने मागील बाजूला मेंदूला दुखापत झाली. या घटने मुजफ्फर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सालमला अटक करण्यात आली.

इतर बातम्या-

Rohit Patil | आरआर आबांच्या मुलाविरुद्ध सर्वपक्षीय पॅनेल, रोहित पाटील म्हणतात, 23 वर्षांचा आहे, 25 पर्यंत कोणाला ठेवणार नाही

Chain Snatching | पादचारी महिलांच्या सोनसाखळ्यांची चोरी, मुंबईत 32 वर्षीय जिम ट्रेनरला अटक

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.