औरंगाबाद: एमजीएमच्या मराठवाडा भूषण पुरस्काराचे वितरण, विजय अण्णा बोराडे व चित्रकार मुरली लाहोटी पहिले मानकरी
औरंगाबाद: एमजीएम संस्थेने (MGM, Aurangabad) सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातील दोन व्यक्तींना दरवर्षी मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी पहिल्या मराठवाडा भूषण (Marathwada Bhushan Award) पुरस्काराचे वितरणही करण्यात आले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, प्रख्यात चित्रकार मुरली लाहोटी यांना महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन […]
औरंगाबाद: एमजीएम संस्थेने (MGM, Aurangabad) सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातील दोन व्यक्तींना दरवर्षी मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी पहिल्या मराठवाडा भूषण (Marathwada Bhushan Award) पुरस्काराचे वितरणही करण्यात आले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ कृषितज्ज्ञ विजयअण्णा बोराडे, प्रख्यात चित्रकार मुरली लाहोटी यांना महात्मा गांधी मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 18 ऑक्टोबरला एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात (Rukhmini Hall, MGM) पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मराठवाड्याच्या कृषी आणि जलक्षेत्रात भरीव योगदान देणारे विजयअण्णा बोराडे (VijayAnna Borade), जगविख्यात चित्रकार मुरली लाहोटी (Murli Lahoti) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक तथा माजी आमदार गिरीश गांधी (Girish Gandhi) यांची प्रमुख उपस्थिती होती.
लाहोटी यांच्या चित्ररेखाटनाने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाची सुरुवात मुरली लाहोटी यांच्या हस्ते चित्र रेखाटून करण्यात आली. मंचावर एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, उपाध्यक्ष डॉ.पी.एम. जाधव, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य प्रतापराव बोराडे, अनुराधा कदम, मंगला बोराडे, शशिकला बोराडे आदी उपस्थित होते. बोराडे, लाहोटी यांना रोख 50 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या दोन्ही मान्यवरांवर प्राचार्या डॉ. रेखा शेळके यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी बोलताना गिरीश गांधी म्हणाले, आपण प्रत्येकाने स्वत:ला तपासून पाहावे. आपण काय करत आहोत, किती प्रामाणिक आहोत याचे उत्तर मिळेल. त्या दिवशी कोणत्याही प्रबोधनाची गरज भासणार नाही.
एकाकडे शेतीचा तर दुसऱ्याकडे खरा कॅनव्हास!
अध्यक्षीय भाषणात एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम म्हणाले, बोराडे आणि लाहोटी हे दोघेही तसे चित्रकारच आहेत. एक स्टुडिओत काही फुटांच्या कॅन्व्हासवर चित्र रंगवतो, तर दुसरा शेताच्या कॅन्व्हासवर शेतीमालाचे उत्पादन करून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद भरतो. त्यामुळे त्यांचा सन्मान आमच्यासाठी मोलाचा आहे. प्रास्ताविक डॉ. शेळके यांनी केले. सूत्रसंचालन देवाशिष शेंडगे यांनी केले तर आभार क्षमा खोब्रागडे यांनी मानले.
पुरस्काराची रक्कम तत्काळ दानासाठी सुपूर्द
पुरस्कारात मिळालेली ५० हजार रुपयांची रक्कम विजयअण्णा बोराडे यांनी अनाथ आणि दिव्यांगांसाठी काम करणारे शंकरबाबा पापळकर यांना देण्याची घोषणा केली. ती रक्कम त्यांनी अंकुशराव कदम यांच्यामार्फत देण्यासाठी त्यांच्याकडे सुपूर्द केली.
इतर बातम्या-
‘सूर्यवंशी’च्या प्रमोशनसाठी कतरिना कैफ पोहोचली ‘झी मराठी’च्या अवॉर्ड फंक्शनमध्ये, पाहा खास फोटो