Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exam Scam: ग्रामीण तरुणांना हायटेक कॉपीची भुरळ, कॉन्स्टेबल राहुलच्या सासऱ्याची पोलीस प्रशिक्षण अकॅडमी!

पिंपरी चिंचवड पोलीस भरती परीक्षेत हायटेक कॉपी केल्याचे समोर आल्यानंतर औरंगाबादेत या गुन्ह्याची पाळमुळं शोधली जातायत. परीक्षेतील कॉपी प्रकरणात दररोज एक नवी माहिती उघड होत आहे.

Exam Scam: ग्रामीण तरुणांना हायटेक कॉपीची भुरळ, कॉन्स्टेबल राहुलच्या सासऱ्याची पोलीस प्रशिक्षण अकॅडमी!
डॉ. रेखा कदम यांच्या घराची झडती, काळवीटाचे कातडे जप्त
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 7:00 AM

औरंगाबादः पिपंरी चिंचवड पोलीस भरतीच्या लेखी उमेदवारांना उत्तरे सांगितल्याप्रकरणी औरंगाबाद येथील सिटी चौक पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल गायकवाड याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. यासोबतच आणखी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींच्या चौकशीतून अजूनच धक्कादायक माहिती उघड होत आहे. विशेष म्हणजे या हायटेक कॉपीची मुळं ग्रामीण भागापर्यंत रुतलेली असल्याचे समोर आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी राहुलला अटक केल्यानंतर या गुन्ह्याचा सखोल तपास सुरु आहे. 2012 साली शहर पोलीस दलात भरती झालेला राहुल गायकवाड हा सासऱ्यासोबत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी चालवत होता. तसेच त्याचे 4 नातेवाईकही पोलीस दलात आहेत. हे सर्वजण ग्रामीण भागातील तरुणांना कॉपीच्या जाळ्यात खेचत असल्याचे समोर येत आहे.

काय आहे मूळ प्रकरण?

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या 720 पदांसाठी राज्यात 19 नोव्हेंबरला भरती प्रक्रिया पार पडली. यावेळी हिंजवडी ठाण्याच्या हद्दीतील केंद्रात नितीन मिसाळ याच्या मास्कमध्ये इलेक्ट्रिक डिव्हाइस जप्त करण्यात आले. पोलीस त्याला पकडण्याच्या तयारीत असताना त्याने पळ काढला. अधिक तपास केला असता, औरंगाबादमधील रामेश्वर शिंदे आणि गणेश वैद्य याने उत्तरे सांगण्यास मदत केल्याचे समोर आले. तसेच वैद्य याला उत्तरे सांगणाऱ्या राहुल गायकवाडलाही सिटी चौक पोलीस स्टेशनमधून अटक करण्यात आले.

हायटेक कॉपीची तरुणांना भुरळ

सिटी चौक पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल राहूल याच्या नातेवाईकांची चौकशी पोलिसांनी केली. यात उघड झालेली माहिती म्हणजे, राहुल हा वैजापूर तालुक्यातील निमगावचा. त्याच्या गावापासून पाच ते सहा किमी अंतरावर कोरडगावात त्याची सासुरवाडी आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, त्याच्या सासऱ्याची आधी शिऊर बंगला येथे भाड्याच्या जागेत छोट्याशा शेडमध्ये अकॅडमी होती. मात्र काही दिवसांपूर्वीच लोणी शिवारात स्वतःच्या जागेत आलिशान अकॅडमी उभी राहिली. गायकवाडच्या सासऱ्याचे राहुलसह दोन जाईव, मुलगा आणि सून पोलीस दलात आहेत. सासरा शेतकरी असल्याचे सांगितले जाते. मग आता ही सुसज्ज अकॅडमी नेमकी कुणाची आहे, याचा तपास पोलीस घेत आहेत.

इतर बातम्या-

शक्ती कायदा’ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर, महिला अत्याचाराला आळा बसणार? काय आहे शक्ती कायदा?

जोरदार! जिल्हा जातपडताळणी समित्यांना एकाच दिवसात मिळाले 14 अधिकारी, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.