पोरी, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, गळफास घेतोय, लवकर मातीला ये.. म्हणत त्यानं जीव संपवला…

मराठवाड्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीत असंख्य शेतकऱ्यांचे हाता-तोडांशी आलेले पीक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. सिल्लोडमध्ये अशाच खचलेल्या शेतकरी बापानं आत्महत्या केल्याचं हृदयद्रावक प्रकार घडलाय.

पोरी, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, गळफास घेतोय, लवकर मातीला ये.. म्हणत त्यानं जीव संपवला...
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 5:09 PM

औरंगाबादः सासरी नांदणाऱ्या लेकीला शेतकरी बापानं फोन लावावा, ‘पोरी, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, आता कर्ज फेडू शकत नाही. जगणं असहाय्य झालंय, इथं बघ शेतातील झाडाला गळफास घेतोय, लवकर मातीला ये..’ असं मोबाइल सांगत आत्महत्या करावी. हा हृदय पिळवटून टाकणारा हा प्रसंग औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये घडलाय. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं बुधवारी पहाटेच चिंचोटी परिसरात आत्महत्या (Farmer suicide) केली.

सिल्लोडमधील चिंचोटी परिसरातील घटना

बालासाहेब लक्ष्मण गोंडे (42) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. चिंचोटी येथील रहिवासी असलेल्या बालासाहेब यांचे पिंपरखेड शिवारात पांढरी येथे दीड एकर शेती आहे. मंगळवारी रात्री 9 वाजता घरातील मंडळींना शेतात चाललो आहे, गोठ्यातच झोपणार आहे, असे म्हणत शेतात गेले. बुधवारी सकाळी सहा वाजता नादलगाव येथे सासरी राहणाऱ्या मुलीला फोन केला. गीतांजली, तुझा बाप कर्जबाजारी झालाय. आता कर्ज फेडू शकत नाही. शेतात यंदा पिकही आलं नाही. सगळं पिक वाया गेलंय. तू लवकर ये, मी आत्महत्या करतोय, असं म्हणत मोबाइलवरचं संभाषण संपवलं.

भाऊ शेतात पोहोचपर्यंत प्राण गेले

गितांजलीने चुलत भाऊ कालिदास याला तत्काळ फोन करून या प्रसंगाची माहिती दिली. दोघा-तिघांनी मिळून शेतात धाव घेतली. पण तोपर्यंत बालासाहेब लक्ष्मण गोंडे हे दोरीच्या सहाय्याने बोरीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती वडवणी पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला. गोंडे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, आई-वडील, एक अविवाहित मुलगी आणि दोन विवाहित मुलीसह 10 वर्षांचा मुलगा आहे.

इतर बातम्या-

धक्कादायकः दहा रुपयांसाठी कुणी जीव जाईपर्यंत मारतं का? काय घडलं औरंगाबादेत?

दारू दिली नाही म्हणून मित्रानेच चिरला मित्राचा गळा; आरोपीला अटक, इचलकरंजीमधील धक्कादायक घटना

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.