AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Election: फुलंब्री नगरपंचायत पोटनिवडणुकीत भाजपसमोर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

फुलंब्री नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दोन्ही वॉर्डांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला.

Aurangabad Election: फुलंब्री नगरपंचायत पोटनिवडणुकीत भाजपसमोर महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
फुलंब्री पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 3:57 PM
Share

औरंगाबादः फुलंब्री येथील नगरपंचायतीच्या दोन वॉर्डांच्या पोटनिवडणुकीत भाजपला दणदणीत पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) येथे दोन्ही ठिकाणी विजय संपादन केला. फुलंब्री (Fulambri) नगरपंचायतीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे संख्याबळ यापूर्वीच जास्त होते. महाविकास आघाडीच्या सदस्यांची संख्या आता पाचवरून सातवर पोहोचली आहे.

दोन जागांवर चुरशीची लढत

फुलंब्री नगरपंचायतच्या वॉर्ड क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पूजा आनंदा ढोके यांचा 279 मते घेऊन विजय झाला आहे. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार विमल ढोके यांना 277 मते मिळाली. केवळ दोन मतांनी राष्ट्रवादीच्या पूजा आनंदा ढोके यांचा विजय झाला. फुलंब्रीच्याच वॉर्ड क्रमांक 8 मध्ये महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अर्चना उमेश दुतोंडे यांनी 434 मते घेऊन विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपच्या रुपाली बनसोडे यांना केवळ 290 मते मिळाली. विशेष म्हणजे ही जागा आधी भाजपच्या ताब्यात होती. आता फुलंब्रीतील या दोन्ही जागा पोटनिवडणुकीत भाजपच्या हातातून गेल्या आहेत. या विजयाचा जल्लोष साजरा करताना महाविकास आघाडीच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी तहसील आवारात फटाके फोडले. तसेच रस्त्यावर विजयी रॅली काढण्यात आली.

इतर बातम्या-

Letter to PM | नाशिक जिल्ह्यातल्या 400 विद्यार्थ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र…

म्याऊ म्याऊच्या घोषणांचा राग का आला? आदित्य ठाकरेंना विचारा…शिवसेनेच्या वाघाचे मांजर झाले-नितेश राणे

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.