AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Gold Rate: औरंगाबादेत सोने 48 हजार रुपयांपुढे, सणासुदीच्या मुहूर्तावर बाजारात उत्साह

शहरातील आजचे 22 कॅरेट सोन्याचे दर 47,000 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे (Gold Rate) दर 48,300 रुपये प्रति तोळा एवढे आहेत. शुद्ध चांदीचा दर 67,500 रुपये प्रति किलो एवढा आहे.

Aurangabad Gold Rate: औरंगाबादेत सोने 48 हजार रुपयांपुढे, सणासुदीच्या मुहूर्तावर बाजारात उत्साह
संग्रहित छायाचित्र
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 8:31 PM
Share

औरंगाबादः गणपती-गौरींच्या आगमनाचे दिवस जवळ येत असताना शहरात सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदीतही वाढ होत आहे. दरम्यान औरंगाबाद (Aurangabad city) शहरातील आजचे 22 कॅरेट सोन्याचे दर 47,000 रुपये प्रति तोळा तर 24 कॅरेट सोन्याचे (Gold Rate) दर 48,300 रुपये प्रति तोळा एवढे आहेत. शुद्ध चांदीचा दर 67,500 रुपये प्रति किलो एवढा आहे. सुटीच्या मुहूर्तावर ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह पहायला मिळू शकतो. (Gold and Silver rate update in Aurangabad, Maharashtra )

200 ते 500 रुपयांची घसरण

कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 200 ते 500 रुपयांची घसरण दिसून आली. काल 24 कॅरेट सोन्याचा दर 48,500 रुपये प्रति तोळा आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 47,200 रुपये प्रति तोळा एवढा होता. शनिवारी आणि रविवारी कमोडिटी मार्केटला सुटी असल्याने पुढील दोन दिवसही सोन्याचे दर हेच राहतील. मात्र त्यानंतरच्या आठवड्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर खरेदीतही वाढ होईल आणि सोन्याच्या दरातही काहीशी वाढ होण्याची चिन्हे आहेत, असा अंदाज औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी व्यक्त केला.

हॉलमार्कच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साह

दरम्यान, केंद्र सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या हॉलमार्किंगची मुदत वाढवण्याचा निर्णय शनिवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत सर्व दागिन्यांना हॉलमार्किंग करणे आवश्यक होते.  आता ही मुदत 31नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे लहान सराफा व्यापारी या काळात हॉलमार्क नसलेले दागिनेही विकू शकतील. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल आणि सराफ व्यापाऱ्यांमध्ये शनिवारी यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

शहरात सध्या दोन हॉलमार्किंग सेंटर

औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारतात जवळपास 60 ते 70 लाख सराफा व्यापारी आहेत. त्यांच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करण्यासाठी किमान 6 ते 7 हजार हॉलमार्किंग केंद्रांची गरज आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर हे केंद्रही नाहीत. जसे की औरंगाबादमध्ये कसारी बाजार आणि सराफा रोडवर हे केंद्र आहेत.  मात्र बीड, जालना, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये हे केंद्र नाहीत. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना दागिन्यांचे हॉलमार्किंग करण्यासाठी औरंगाबादला यावे लागते. यात खूप वेळ आणि खर्च लागतो. मात्र, शनिवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील आणखी एक निर्णय घेण्यात आला. मोठे ज्वेलर्स आता स्वतःचे हॉलमार्किंग सेंटर सुरू शकतात आणि तिथेच हॉलमार्किंग करू शकतात, असा निर्णय झाला. त्यामुळे दागिन्यांचे हॉलमार्किंग प्रक्रियेत होणारा विलंब व्यापाऱ्यांना टाळता येईल.

(Gold and Silver rate update in Aurangabad, Maharashtra )

Pune Gold Rate | सोन्याची झळाळी कायम, पुण्यात आजही सोनं 50 हजारांच्या पुढेच, चांदीही वधारली

Gold Hallmarking: सोन्याची खरेदी करताय, आजपासून लागू होतोय ‘हा’ नवा नियम

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.