औरंगाबादेत सोनसाखळी हिसकावण्याची मालिका सुरूच, ज्योती नगरात घटना, चार दिवसात सहा चोऱ्या

कर्णपुरा देवी मंदिर परिसरात दोन मंगळसूत्र चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुकामाता मंदिर परिसरातून तीन महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेले. यानंतर शनिवारी सकाळी सहावी घटना घडली.

औरंगाबादेत सोनसाखळी हिसकावण्याची मालिका सुरूच, ज्योती नगरात घटना, चार दिवसात सहा चोऱ्या
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 12:13 PM

औरंगाबाद: शहरातील शहानूरमिया दर्गा रोडवर असलेल्या मोर सुपरमार्केटमधून खरेदी करून घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेण्याची घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत सोनसाखळी किंवा मंगळसूत्र हिसकावून घेण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. शनिवारी घडलेल्या आणखी एका घटनेने या प्रकाराचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.

दुचाकीस्वाराने मागून येऊन हिसकावली

मंजिरी मनोज जहागीरदार (43) या ज्योतिनगरात राहणाऱ्या शासकीय नोकरदार आहेत. शनिवारी सकाळी त्या जावेसोबत खरेदीसाठी घराबाहेर पडल्या होत्या. ज्योतीनगर भागातील शहानूरमिया दर्गा रोडवर असलेल्या मोर सुपरमार्केट येथे खरेदी केल्यानंतर घराकडे पायी निघाल्या होत्या. तेव्हा अग्रवाल यांच्या घरासमोर येताच, पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोराने त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन हिसकावली. या प्रकारामुळे मंजिरी यांनी तातडीने आरडाओरड सुरु केली. मात्र तोपर्यंत दुचाकीस्वार चोरटा काल्डा कॉर्नरच्या दिशेने निघून गेला.

उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

हा प्रकार घडल्यानंतर जहागिरदार यांनी उस्मानपुरा पोलीसांना या घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, संजय खोसरे, गुन्हे राजेंद्र साळुंके यांच्यासह पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. चोराचा शोध घेण्यासाठी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यात घटनाही कैद झाली आहे. यावरून पोलिसी सदर चोराचा शोध घेत आहे. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक प्रवीण वाघ हे करीत आहेत.

चार दिवसात सहावी घटना

नवरात्र आणि दसऱ्याच्या निमित्ताने शहरातील रस्त्यांवर महिला वर्गाची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. या काळात मंगळसूत्र चोरीच्या घटनाही जास्त घडलेल्या दिसून आल्या. मागील चार दिवसात मंगळसूत्र चोरीची ही सहावी घटवना आहे. कर्णपुरा देवी मंदिर परिसरात दोन मंगळसूत्र चोरीच्या घटना उघडकीस आल्यानंतर सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुकामाता मंदिर परिसरातून तीन महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेले. यानंतर शनिवारी सकाळी सहावी घटना घडली.

वाळूजमधून धारदार तलवारीसह एक जण जेरबंद

वाळूज परिसरातील जोगेश्वरी गावात एका तरुणाला काही नागरिकांनी धारदार तलवारीसह पकडून वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले. जोगेश्वरी येथील रामराई रोड, सैलानीबाबा दर्ग्याजवळ अफजल शेख सरदार (25) हातामध्ये तलवार घेऊन फिरत होता. दरम्यान, गणेश सुखदेव काजळे, ज्ञानेश्वर विठ्ठल काजळे, महेश रामनाथ दुबिले व सुदाम राधाकिसन काजळे यांनी त्याला तलवारीसह पकडून ठेवले. तसेच फोनवर पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. उपनिरीक्षक राजेंद्र बांगर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून अफजलला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पोलिस शिपाई हनुमान ठोके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.