AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Gold: स्वस्तातली संधी, सुवर्णसंधी सोडू नका, सोन्याचे भाव पडले, वाचा औरंगाबादेत काय आहेत दर?

औरंगाबादच्या सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे भाव 45,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो शुद्ध चांदीचे भाव आज औरंगाबादमध्ये 63,200 रुपये एवढे नोंदवले गेले.

Aurangabad Gold: स्वस्तातली संधी, सुवर्णसंधी सोडू नका, सोन्याचे भाव पडले, वाचा औरंगाबादेत काय आहेत दर?
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 6:05 PM
Share

औरंगाबाद: आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशांतर्गत आर्थिक सुधारणांकरिता राबवल्या जाणाऱ्या योजना या सर्वांचा संमिश्र परिणाम सध्या सराफा बाजारावर (Aurangabad Sarafa market) पहायला मिळत आहे. परिणाम सोन्याचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत. मात्र येत्या काळात म्हणजेच पुढील काही महिन्यांत सोन्याचे भाव (Gold Price) वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. औरंगाबादमध्येही गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सतत घसरतेच दिसून आलेत. सोन्याने सप्टेंबर महिन्यातील निचांकी पातळी (Lowest gold price in September) गाठल्याचा आजचा सलग तिसरा दिवस आहे.

काय आहेत औरंगाबादमधील भाव?

औरंगाबादच्या सराफा बाजारात आज 22 कॅरेट सोन्याचे भाव 45,800 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. काल म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी हे भाव 45,850 एवढे नोंदले होते. त्यामुळे महिन्यातील निचांकी पातळी गाठण्याची मालिका आजही सुरूच असल्याचे दिसून आले. तर एक किलो शुद्ध चांदीचे भाव आज औरंगाबादमध्ये 63,200 रुपये एवढे नोंदवले गेले. कालच्या दरांपेक्षा चांदीच्या दरातही आज 200 रुपयांची घसरण दिसून आली, ही माहिती औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिली.

सोन्यात गुंतवणुकीची हीच तर संधी!

सध्या सोने सप्टेंबर महिन्यातील जवळपास निचांकी पातळीवर आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

गुंतवणुकीतील तज्ज्ञांचं मत काय?

आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.

याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad Gold: आज सोने पंचेचाळीशीच्या दिशेने… पाच वर्षात नव्वदी पार करणार, औरंगाबादचे काय आहेत भाव?

PHOTO | गोल्ड स्पॉट एक्सचेंज म्हणजे काय! सेबीने मंजूर केलेल्या, सामान्य लोकांना मिळेल थेट लाभ

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.