सोन्याची चमक वाढतच जाणार, दिवाळीनंतर भावात आणखी तेजी, वाचा औरंगाबादचे भाव

25 ऑक्टोबर रोजी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 48,050 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले.

सोन्याची चमक वाढतच जाणार, दिवाळीनंतर भावात आणखी तेजी, वाचा औरंगाबादचे भाव
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 7:01 PM

औरंगाबादः आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींनुसार सोन्याच्या भावात दिवसेंदिवस तेजी येत आहे. त्यानुसार भारतातील विविध शहरांतील सोन्याच्या भावातही (Gold Price hike) वाढ दिसून येत आहे. दिवाळी आणि लग्नसराईच्या निमित्ताने ग्राहक वर्गही सराफा बाजारात गर्दी करू लागला आहे. औरंगाबादच्या सराफा बाजारातही सध्या चांगलीच वर्दळ दिसून येत आहे.

पन्नाशीच्या दिशेने सोन्याची वाटचाल

औरंगाबादमध्ये सोन्याचे दर येत्या काही दिवसात पन्नास हजारांचा आकडा गाठण्याची चिन्हे आहेत. 25 ऑक्टोबर रोजी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 49,200 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 48,050 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. रविवारी 24 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 49,750 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 45,770 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. अर्थात शेअर बाजार तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अनुषंगाने सोन्याच्या दरात दर काही मिनिटांनी चढ-उतार पहायला मिळत असतो. त्यामुळे सदर वृत्तात दिलेले दर हे वृत्त लिहिताना घेतलेली नोंद आहे. प्रत्यक्ष सराफा बाजारात गेल्यावर या भावांमध्ये शंभर ते दोनशे रुपयांचा फरक जाणवू शकतो.

फँसी दानिन्यांची ग्राहकांना भुरळ

भारतीय परंपरेनुसार, सोन्याकडे गुंतवणुकीचे माध्यम म्हणून पाहिले जाते. त्यामुळे सणासुदीत शुद्ध सोन्याचे वेढ किंवा मणी घेण्याची प्रथा आहे. आता मात्र बहुतांश ग्राहक ओरिजनल सोन्यासोबतच विविध डिझाइनच्या दागिन्यांना पसंती देताना दिसत आहेत. किंबहुना काही व्यापाऱ्यांच्या मते, ग्राहक हल्ली फँसी दागिने, हिऱ्यांचे दागिने यांनाच जास्त पसंती देत आहेत, अशी माहिती सराफा व्यापाऱ्यांनी दिली.

गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार आता ईजीआरद्वारे

गोल्ड एक्सचेंजमध्ये आता सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (पावती) अर्थात ईजीआरद्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की, ईजीआरची किमान किंमत किती असेल. यानंतर शेअर बाजार EGR चे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या मते, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR च्या ट्रेडिंग आणि फिजिकल सोन्याच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. ईजीआरच्या खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय व्यासपीठ असेल. ईजीआरअंतर्गत मानक सोन्याचा व्यापार केला जाईल आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.

सोन्याची किंमत 57 हजारांपासून 60 हजारांपर्यंत जाणार

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅम पर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात.

इतर बातम्या-

मनपा निवडणुकीसाठी एमआयएमच्या मोर्चेबांधणीला वेग, असदुद्दीन ओवैसी दोन दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावर

Weather: औरंगाबादचा पारा घसरतोय, आरोग्य सांभाळा, वाचा कधी होती सर्वाधिक थंडी?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.