Gold Silver Price: सोने-चांदीच्या भावात वाढीचा ट्रेंड, वाचा महत्त्वाच्या शहरात किती भाव?
गेल्या काही दिवसातील स्थिती पाहता, सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली दिसून येत आहे. आज भारतात 24 कॅरेट सोन्याचे भाव 50,180 रुपये प्रति तोळा एवढे झाले तर एक किलो शुद्ध चांदीचे दर 62, 500 रुपयांवर पोहोचले.
नवी दिल्लीः भारतीय बाजारातील चढ-उताराचे परिणाम सराफा बाजारावर दिसून आले. सराफा बाजारात सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात आज वाढ झालेली दिसून आली. नवी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचे दर 5,180 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 4,750 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. मागील दोन आठवड्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात काहीशी वाढ होताना दिसत आहे. नवी दिल्लीत आज एक किलो शुद्ध चांदीचे दर 62,500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. त्यामुळे
कोणत्या शहरात किती भाव?
मुंबई- 24 कॅरेट सोन्याचे दर 48,220 रुपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याचे दर 47,220 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. एक किलो शुद्ध चांदीचे दर 62,500 रुपये प्रति किलो एवढे दिसून आले.
पुणे- शहरात 24 कॅरेट सोन्याचे दर 48,890 रुपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46370 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. एक किलो शुद्ध चांदीचे दर 62,500 रुपये प्रति किलो एवढे दिसून आले.
नागपूर- शहरात 24 कॅरेट सोन्याचे दर 48220 रुपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याचे दर 47220 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. एक किलो शुद्ध चांदीचे दर 62,500 रुपये प्रति किलो एवढे दिसून आले.
नाशिक- शहरात 24 कॅरेट सोन्याचे दर 48,890 रुपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46370 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. एक किलो शुद्ध चांदीचे दर 62,590 रुपये प्रति किलो एवढे दिसून आले.
औरंगाबाद- शहरात 24 कॅरेट सोन्याचे दर 48,990 रुपये प्रति तोळा तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46500 रुपये प्रति तोळा एवढे नोंदवले गेले. एक किलो शुद्ध चांदीचे दर 62,700 रुपये प्रति किलो एवढे दिसून आले.
आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढताना दिसून येत आहेत. अमेरिकेत सोन्याचा व्यापार 0.74 डॉलरने वाढला. आज सोने 1,813.06 डॉलर प्रति औस या पातळीवर होते. तर चांदीच्या व्यापारातही वाढ दिसून आली. चांदीचे दर 0.01 डॉलरने वाढले. चांदीने आज 23.07 डॉलर प्रति औसांवर व्यापार केला.
इतर बातम्या-