Aurangabad Gold Update: औरंगाबादेत चांदी चांगलीच चकाकली, 1000 रुपयांनी महागली, सोन्यातही 500 ची वाढ

आज ते 69,200 रुपये प्रति किलोच्या आसपास आहेत. तसेच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

Aurangabad Gold Update: औरंगाबादेत चांदी चांगलीच चकाकली, 1000 रुपयांनी महागली, सोन्यातही 500 ची वाढ
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 3:50 PM

औरंगाबाद: शहरातील सराफा बाजारात (Aurangabad sarafa market) आज आठवड्याच्या सुरुवातीला आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर उत्साह पहायला मिळाला. गणपती आणि महालक्ष्मी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिक चांदीच्या वाट्या, मुकूट, कलश, चांदीचे मोदक आदी वस्तू विकत घेण्याचे प्रमाम वाढते. त्यामुळे चांदीचे दरही वाढलेले दिसून येत आहेत. आज औरंगाबादमध्ये चांदी तब्बल एक हजार रुपयांनी वाढली. तर  सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ झालेली दिसून आली. मागील दोन दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. आज शेअर बाजाराचा आठवड्याचा पहिला दिवस सोने व चांदीच्या किंमतीतही चांगलीच उसळी पहायला मिळत आहे. शेअर बाजाराच्या किंमतीतील चढ-उतारानुसार, प्रत्येक शहरातील सोन्या-चांदीच्या दरात दर सेकंदाला चढ-उतार दिसून येत असतो. मात्र या ठिकाणी दिलेले भाव गेल्या काही तासांतील सरासरी अंदाज काढून देण्यात आलेले आहेत.

आज चांदीचे दर हजार रुपयांनी वाढले

औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शहरात 22 कॅरेट सोन्याचे भाव 47 हजार 500 रुपये प्रति तोळा आहेत. मागील दोन दिवस हे दर 47 हजार रुपयांच्या आसपास होते. तसेच चांदीच्या भावातही चांगलीच उसळी पहायला मिळते आहे. चांदीचे भाव या आधी 68 हजार रुपयांच्या आसपास होते. मात्र आज ते 69,200 रुपये प्रति किलोच्या आसपास आहेत.

तसेच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. भारतातील महत्त्वाच्या शहरांमधील सोन्याचे भाव पहायचे झाल्यास, आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव 47,500 रुपये प्रति तोळा, कोलकाता 47 हजार 500 रुपये प्रति तोळा, चेन्नईत 47 हजार 500 रुपये प्रति तोळा तर नवी दिल्लीत 47 हजार 500 रुपये प्रति तोळा असे आहेत.

डिजिटल गोल्ड म्हणजे काय?

डिजिटल स्वरुपातील सोनं हे तुम्ही ऑनलाईन खरेदी करु शकता. हे सोनं विक्रेत्याकडून इन्शुअर्ड व्हॉल्टसमध्ये संग्रहित केले जाते. तुम्ही अगदी स्मार्टफोनवरुनही डिजिटल गोल्डची खरेदी करु शकता. विशेष म्हणजे तुम्ही अगदी कमी प्रमाणात म्हणजे अगदी 100 रुपयांचे सोनेही विकत घेऊ शकता. पेटीएम, गुगल पे आणि फोन पे या तुमच्या दैनंदिन वापरातील मोबाईल अॅप्सचा वापर करुनही तुम्ही हे सोनं विकत घेऊ शकता. याशिवाय, एचडीएफसी सिक्युरिटीज आणि मोतीलाल ओसवाल यांच्यासारख्या ब्रोकर्सकडेही डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

डिजिटल गोल्ड खरेदी करण्याचे फायदे

तुम्ही डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करताना किती लहान रक्कम गुंतवू शकता. तुम्ही अगदी 100 रुपयांचे सोने खरेदी करायचे ठरवले तर तेदेखील शक्य आहे. यामध्ये सोन्याच्या शुद्धतेची 100 टक्के हमी असते. तसेच पारंपरिक सोने खरेदीत मोडणाऱ्या वळी, सोन्याची नाणी किंवा दागिन्यांप्रमाणे यावर घडणावळीचे पैसे (Making Charges) लागत नाहीत. तुम्ही डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ज्या कंपनीच्या माध्यमातून करणार आहात, त्या कंपनीचा रेकॉर्ड तपासून पाहणे गरजेचे आहे.

इतर बातम्या- 

Aurangabad Gold Rate: लक्ष असू द्या, सोन्याचे दर वाढीच्या दिशेने, पहा औरंगाबाद शहरातले सोन्याचे भाव

Gold/Silver Price: सोन्यात घसरण सुरूच, किंमत 2 आठवड्यांत नीचांकी पातळीवर, नवे दर काय?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.