डॉ. कारभारी काळे यांची ‘बाटु’च्या कुलगुरुपदी नियुक्ती,  निवड समितीची काळेंना पसंती

डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र  विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. डॉ. कारभारी काळे हे सध्या औरंगाबाद येथी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.

डॉ. कारभारी काळे यांची 'बाटु'च्या कुलगुरुपदी नियुक्ती,  निवड समितीची काळेंना पसंती
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 6:57 PM

औरंगाबाद : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र  विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. डॉ. कारभारी काळे हे सध्या औरंगाबाद येथी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची 65 वर्षे पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत केली आहे.

कुलगुरु डॉ. वेदला रामा शास्त्री यांच्या राजीनाम्यानंतर पद रिक्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  तंत्रशास्त्र  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलगुरु डॉ. अनिरुध्द पंडित यांच्याकडे  28 मार्च 2021 रोजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

डॉ. कारभारी काळे यांचा अल्पपरिचय

डॉ. कारभारी काळे यांनी  भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या  कुलगुरुंच्या  निवडीसाठी राज्यपालांनी  संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.  विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था, नागपुरचे संचालक प्रा. प्रमोद पडोळे आणि महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. कारभारी काळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

उद्या लांडेवाडीत घुमणार भिर्रर्र … चा आवाज ; बक्षिसाची रक्कम ऐकून व्हाल आवक

Corona: अंबरनाथमध्ये परदेशातून आलेले दोघे पॉझिटिव्ह, दोन दिवसात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी पालिका सज्ज

चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठ्ठं नशीब … तू टेन्शनमध्ये पाठवलंस, आंघोळ करता करता थांबलो: नारायण राणे

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.