अबब!!! ढगफुटीपेक्षाही भयंकर कालचा औरंगाबादचा पाऊस, वाचा पावसाच्या सरी किती तुफान वेगानं बरसल्या

तीस मिनिटांच्या कालावधीत 56:2 मिमी पावसाची नोंद झाली. सामान्यपणे ताशी 100 मिमी वेगाने पाऊस झाल्यास त्याला ढगफुटी म्हटली जाते. मात्र कालचा पाऊस त्यापेक्षा जास्त वेगाने होता.

अबब!!! ढगफुटीपेक्षाही भयंकर कालचा औरंगाबादचा पाऊस, वाचा पावसाच्या सरी किती तुफान वेगानं बरसल्या
शहरात कालच्या ढगफुटीमुळे रस्त्यांवर वाहने चालवणे मुश्कील झाले. उस्मानपुरा भागातील हे छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 2:09 PM

औरंगाबाद: गेल्या अनेक दिवसापासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या औरंगाबादकरांनी काल मंगळवारी संध्याकाळी ढगफुटीचा हाहाकार अनुभवला. ही ढगफुटी असल्याची कल्पना अनेकांना आली. मात्र  हवामान तज्ञांच्या मते, काल शहरात वीजेच्या कडकडाटासह झालेला अति मुसळधार पाऊस हा ढगफुटीपेक्षाही Heavy rainfall, Thunderstorm in Aurangabad) भयंकर होता. कारण 7 सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसाच्या सरींचा वेग एवढा जास्त होता की, ढगफुटीतील पावसाचा वेगही त्याने मागे टाकला. हवामान खात्याने 7 आणि 8 सप्टेंबर रोजी औरंगाबादेत ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र एवढा तुफ्फान पाऊस पडेल, याची कल्पना कुणालाही नव्हती.

आधी रिमझिम.. मग थेट रौद्र रुप

07 सप्टेंबर रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र संध्याकाळी 7.10 वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पुढच्या दोन-तीन मिनिटात म्हणजेच 7.12 मिनिटातच पावसानं रौद्र रुप धारण केलं. त्यानंतर आकाशात प्रचंड वीजांचा कडकडाट आणि अखंड पाऊसधारांचा वर्षाव हे चित्र तब्बल तासभर चाललं. या तासाभरात शहर आणि परिसरात पावसाचं जणू तांडव नृत्य सुरु होतं. पुढे 8.15 म्हणजेच सव्वा आठच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा कमी झाला.

ढगफुटीपेक्षाही भयंकर पाऊस कसा?

प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल शहरात ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. सुरुवातीच्या तीस मिनिटात म्हणजे 7:40 मिनिटापर्यंत पाऊस पडण्याचा सरासरी वेग हा 166:75 मिमी असा नोंदवला गेला. या तीस मिनिटांच्या कालावधीत 56:2 मिमी पावसाची नोंद झाली. सामान्यपणे ढगफुटीदरम्यान ताशी 100 मिमी वेगाने पाऊस झाल्यास त्याला ढगफुटी म्हटली जाते. मात्र कालचा पाऊस त्यापेक्षा जास्त वेगाने होता. रात्री 7.40 नंतर पावसाचा वेग थोडा कमी होत गेला. 07:50 पर्यंत सरासरी 86:9 मी मी वेग होता व नंतर 08:10 वाजेपर्यंत तो कमी होत 53:24 मीमी प्रति तास पावसाचा वेग राहिला तर सायंकाळी 07:10 ते 08:10 या एका तासात  87.6  मी. मी. औरंगाबाद शहरात पावसाची नोंद झाली.

तासाभराच्या तडाख्याने शहरात दाणादाण

शहरात तासभर चाललेल्या या पावसाच्या धुमाकुळामुळे अनेक घरात पाणी शिरले. शहरातील जालना रोड, बीड बायपास रोड या दोन महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रचंड पाणी आले. रात्रीच्या अंधारात वाहनांना पाण्यातून वाट काढणेही मुश्कील झाले. अनेक घरात, हौसिंग सोसायट्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे संध्याकाळी ऑफिसमधून घरी येणाऱ्या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. काही ठिकाणी उभ्या असलेल्या कारमध्ये पाणी शिरून त्या वाहू लागल्या तर अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले.

आजही औरंगाबाद व जालन्यात कोसळणार

दरम्यान आज 8 सप्टेंटबर रोजी औरंगाबाद आणि जालन्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज सकाळपासून औरंगाबाद शहरात सूर्यानं दर्शन दिलं आहे. कालच्या पावसाच्या थैमानानंतर हे ऊन वातावरण सुखावणारं ठरत आहे. मात्र ढगांचं अच्छादन अजूनही शहरावर असल्याने संध्याकाळीही पावसाचा आणखी एक तडाखा बसू शकतो, असा अंदाज आहे. (Heavy rainfall and thunderstorm in Aurangabad city on 07 September night)

इतर बातम्या- 

Maharashtra Rain Live Updates | बाम्हणी-वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या तिघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध शुरु

Maharashtra Rain Updates : राज्यात ठिकठिकाणी पाऊस, कुठं मुसळधार, तर कुठं सर्वदूर रिमझिम

औरंगाबादेत ढगफुटीने हाहाकार, रात्रीतून पावसाचे तांडव, घरात- रस्त्यांवर पाणीच पाणी, ग्रामीण भागात पिकंही वाहून गेली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.