PHOTO: मराठवाड्यात पावसाचे थैमान, पूराचे पाणी गावात शिरले, पिकंही वाहून गेली, दोरखंडाला धरून जीवघेणा प्रवास

सोमवारी रात्रीपासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा मारा सुरु आहे. यामुळे अनेक गावांतील नद्यांना पूर आला असून शेतीचे तसेच गावातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

| Updated on: Sep 28, 2021 | 3:14 PM
औरंगाबाद जिल्ह्यातील ढेकू नदीला तुफान पूर आला. या परिसरातील बाभूळगावातील एक जेसीबीचा व्हिडिओ समोर आला आहे.  नदीच्या पलीकडे अडकलेल्या मुलांची जेसीबीच्या साहाय्याने सुटका करण्यात आली. जेसीबीच्या फावड्यात बसवून पुराच्या पाण्यातून मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.  जेसीबीने मुलांची सुटका केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

1 / 9
औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथे नदीच्या पुराचे पाणी गावात घुसले. पुराच्या पाण्याचा एवढा मोठा प्रवाह पाहून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला. या प्रवाहात गावातील व्यावसायिकांच्या टपऱ्या गेल्या वाहून गेल्या. या पाण्याचा वेग एवढा तुफान वेग होता की या व्यावसायिकांच्या या टपऱ्या काही क्षणात, गावकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेल्या.

2 / 9
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने परिसराला झोडपले. बानोटी वरठाण घोसला परिसरातही पावसाचा हाहाकार पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. सुदैवाने यावेळच्या पावसात कुठलीही जीवित्त हानी झालेली नाही. बानोटी परिसरात नदीचे पाणी गावातील रस्त्यावर घुसले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

3 / 9
सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजना नदीला आलेल्या पुरामुळे पिशोर येथील रामेश्वर वस्तीवर जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नदीवर एक दोरखंड बांधण्यात आला आहे. त्या दोर खंडास पकडून शेतकऱ्यांना ये-जा करावी लागत आहे.  आज सकाळी दोरखंड पकडलेले असताना एक जण वाहून जात होता. मात्र आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला वाचवले. त्याामुळे मोठी दुर्घटना टळली.

4 / 9
संग्रहित छायाचित्र.

संग्रहित छायाचित्र.

5 / 9
उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तेर ढोकी कळंब या भागात ढगफुटी झाली आहे. शेतात 4 ते 5 फूटपाणी असून सरकारने पंचनामे न करता थेट मदत करावी,  अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

6 / 9
उस्मानाबाद येथे अतिवृष्टी झाली असून यामुळे नळदुर्ग येथील प्राचीन किल्ल्यातील पाणी महल येथील नर मादी धबधबा वरून पाणी वाहत आहे.  नर-मादी धबधबा हे पर्यटकांचे आकर्षण असून त्या किल्ल्याच्या भिंतीवरून पाणी जात आहे.  यावरून पावसाचे रौद्ररूप व भीषणता दिसत आहे.

7 / 9
नांदेडची गोवर्धन घाट इथली मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. गोदावरी नदी काठी असलेल्या या स्मशानभूमीत अर्ध्याच्यावर पाणी शिरलं. विष्णुपुरी प्रकल्पाचे आठ दरवाजे कालपासून उघडे असून पाण्याची आवक वाढतच चालली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केलं आहे. त्यातच नांदेडमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

8 / 9
जालना जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे, अंबड- मंठा सह सर्वच तालुक्यात पावसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळा मध्ये 133 मिली मीटर पाऊस पडल्याने ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली.  करंजळा येथे गल्हाटी नदीचे पाणी करंजळा गावात शिरल्याने अनेकांचे घरात पाणीच पाणी झाले आहे.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.