औरंगाबादेत भारत-बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन, आजपासून रंगणार तीन वनडे सामन्यांची मालिका

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी बीडच्या ज्योतिराम घुलेला मिळाली आहे. संघाच्या उपकर्णधारपदी दीपक जावळे यांची निवड झाली. भारतीय संघात या दोघांसह राजू चव्हाण, मनोज धोत्रे, जमीर पठाण हे पाच महाराष्ट्रीयन खेळाडू आहेत .

औरंगाबादेत भारत-बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन, आजपासून रंगणार तीन वनडे सामन्यांची मालिका
आजपासून भारत-बांग्लादेश तीन दिवसीय वन डे दिव्यांग क्रिकेट स्पर्धा
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 12:28 PM

औरंगाबादः  शहरात आजपासून तीन दिवस भारत-बांग्लादेश (India-Bangladesh ODI) दरम्यान दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pamdey)  यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील एमजीएमच्या मैदानावर आज भारत-बांग्लादेश या देशांदरम्यान दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला (Cricket tournament) सुरुवात होत आहे. या दोन्ही संघात तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. आज मंगळवारी सलामीचा सामना एमजीएमच्या मैदानावर होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व बीडचा गुणवंत खेळाडू ज्योतिराम घुले (Jyotiram Ghule) हा करतोय. तर बांग्लादेशच्या संघाचे नेतृत्व सायमॉनकडे आहे. या क्रिकेट स्पर्धेसाठी बांग्लादेशचा दिव्यांग क्रिकेट संघ सोमवारी औरंगाबादमध्ये दाखल झाला आहे. बांग्लादेश संघ या दौऱ्यात भारताविरुद्ध वन डे, कसोटी आणि टी-20 सामने खेळणार आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व ज्योतिराम घुले याच्याकडे

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी बीडच्या ज्योतिराम घुलेला मिळाली आहे. खेळातील कारकीर्दीच्या पदार्पणातच ज्योतिराम घुलेला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे पदार्पणातच टीमला मालिका विजय मिळवून देणार, असा निश्चय केल्याची माहिती त्याने पत्रकार परिषदेत दिली. भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी दीपक जावळे यांची निवड झाली. भारतीय संघात या दोघांसह राजू चव्हाण, मनोज धोत्रे, जमीर पठाण हे पाच महाराष्ट्रीयन खेळाडू आहे . सामन्यांच्या सुरुवातीला भारतीय संघाने बॅटिंग घेतली असून 20 ओव्हरमध्ये भारतीय संघाने 127 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या.

मनपा प्रशासकांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

या स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते झाले. तसेच एमजीएमचे डीन प्रवीण सूर्यवंशी, एँडर्स अँड हाऊजर्स कंपनीचे मॅनेजर श्रीराम नारायणन हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला विजय पांगरेकर, सिडको पोलीस स्टेशनचे एपीआय संभाजी पवार, स्मार्ट सिटी बसचे प्रोजेक्ट मॅनेजर आदित्य तिवारी, एँडर्स अँड हाऊजर्स कंपनीचे संदीप तुळापूरकर तसेच बोर्ड ऑफ डिसेबल्ड क्रिकेट असोसिएशनचे अली सर यांची विशेष उपस्थिती होती. या क्रिकेट सामन्यांचे आयोजकत्व महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघाचे संजय चव्हाण यांच्याकडे आहे.

29 ऑक्टोबरला अंतिम सामना

या वन डे मालिकेसाठी बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट पटूंची टीम सोमवारीच औरंगाबादेत दाखल झाली आहे. बांग्लादेशाच्या चमूत एकूण 24 जण असून त्यांची व्यवस्था हर्सूल परिसरातील क्लीक हॉटेल येथे करण्यात आली आहे. 29 ऑक्टोबर रोजी या मालिकेतील अंतिम सामना असून 30 ऑक्टोबरला बांग्लादेश क्रिकेटची टीम औरंगाबादहून रवाना होईल.

इतर बातम्या-

Weather: ऐन हिवाळ्यात ढगांचे मळभ का? तळपता सूर्य पुन्हा का गायब झाला? वाचा मराठवाड्यातला हवामानाचा अंदाज

औरंगाबादः कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला, नव्या वर्षात 10 समित्यांच्या निवडणुका

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.