Panchakki | नहरीमधून पाणी आणलं, तंत्रज्ञान, स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना; वारसा जपणाऱ्या पानचक्कीला भेट दिलीत ?
औरंगाबाद शहरातील हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून ते निजामकालीन आहे. येथे पाण्यावर चालणारी चक्की (पिठाची चक्की) आहे. याच कारणामुळे या ठिकाणाला पानचक्की असे म्हणतात. या ठिकाणावर येणारे पाणी शहराच्या बाहेरून तब्बल सहा किमीवरुन जमिनीच्या खालून एका नहरीद्वारे आणले जाते.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्याला राज्याची पर्यटन राजधानी म्हटलं जातं. या जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा जपून ठेवणाऱ्या अनेक वास्तू आहेत. या जिल्ह्यातील गड, किल्ले, दरवाजे अशा अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे आणि कुतूहल निर्माण करणारे ठिकाण म्हणजे पानचक्की होय. या ठिकाणी तंत्रज्ञानाचा खुबीने केलेला वापर पाहण्यासारखा आहे.
पानचक्की म्हणजे काय ?
औरंगाबाद शहरातील हे एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून ते निजामकालीन आहे. येथे पाण्यावर चालणारी चक्की (पिठाची चक्की) आहे. याच कारणामुळे या ठिकाणाला पानचक्की असे म्हणतात. या ठिकाणावर येणारे पाणी शहराच्या बाहेरून तब्बल सहा किमीवरुन जमिनीच्या खालून एका नहरीद्वारे आणले जाते. नंतर हेच पाणी 20 फुट उंचीवरुन एका मानवनिर्मित धबधब्याच्या स्वरुपात एका मोठ्या हौदमध्ये पडते. हे ठिकाण म्हणजे मध्ययुगीन अभियांत्रिकीचे एक उत्तम उदाहरण आहे.
पानचक्की सतराव्या शतकातील वास्तू
पाणचक्कीमध्ये पाण्याच्या दाब निर्माण करुन दगडी जाते फिरवण्याची किमया साध्य केलेली आहे. ही कल्पना तब्बल 400 वर्षांपूर्वीच अमलात आणलेली आहे. ही चक्की उभी करण्यात मलिक अंबरचे मोठे योगदान आहे. त्याने नहरींच्या माध्यमातून पानचक्की या ठिकाणावर पाणी आणले. तसेच 17 व्या शतकाच्या सुरुवातीला आणि उत्तरार्धात अशा दोन भागात या पानचक्कीचे बांधकाम झाले. सुरुवातीला मलिक अंबरने ‘नहर-ए-अंबरी’चे काम केले होते.
भिंतीवर नेण्यात आलेले पाणी नंतर हौदामध्ये पडते
नंतर सतराव्या शतकात ‘नहर-ए- पाणचक्की’चे बांधकाम करण्यात आले. पाणचक्कीच्या या परिसरात सुफी संत बाबा शहा मुसाफीर हे राहत असत. मुसाफीर यांचे शिष्य बाबा शहा महमूद यांनी या पानचक्कीचे बांधकाम केलेले आहे. नहरीमधून आणलेले पाणी नंतर भिंतीवर नेण्यात आले. तेच पाणी नंतर खालच्या हौदात पडते. पाणी खाली पडताना मोठा धबधबा निर्माण होतो. हाच धबधबा पाहण्यासाठी लोक या स्थळाला आवडीने भेट देतात.
पानचक्कीच्या हौदाचे वैशिष्य काय आहे ?
भिंतीवर नेण्यात आलेले पाणी नंतर थेट खाली हौदात पडते. हा हौद साधारणत: 160 फूट लांब आणि 31 फूट रुंद आहे. या हौदात पडणारे पाणी नंतर खाम नदीत जाते. येथे एक मशीदसुद्धा आहे. या मशिदीचे बांधकाम मनाला भुरळ घालणारे आहे. अशा या उत्कूतेने भरलेल्या ठिकाणाला एकदातरी भेट द्यायलाच हवी.
इतर बातम्या :
तुरुंगातून सुटल्यानंतर आर्यन खान काय वाचतोय?; स्वीडिश लेखकाचं हे पुस्तक माहीत आहे काय?