Samruddhi Highway | जालना-नांदेड मार्गावरील 87 गावांतून जाणार रस्ता, किती कोटींचा प्रोजेक्ट? कधी होणार पूर्ण?

समृद्धी महामार्गातील विस्तारीत भाग असलेल्या प्रस्तावित जालना-नांदेड द्रुतगती मार्गासाठी एकूण 14 हजार 500 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. जालना ते नांदेड या महामार्गादरम्यान परभणीतून 93 किलोमीटरचा पट्टा, जालना जिल्ह्यातून 66.46 किलोमीटरचा पट्टा तर नांदेड जिल्ह्यातून 19.82 किलोमीटरचा पट्टा जाईल.

Samruddhi Highway | जालना-नांदेड मार्गावरील 87 गावांतून जाणार रस्ता, किती कोटींचा प्रोजेक्ट? कधी होणार पूर्ण?
प्रस्तावित महामार्ग
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 12:29 PM

औरंगाबाद| नांदेड- मुंबई या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) जालना ते नांदेड (Jalna Nanded Express way) द्रुतगती मार्गाचे काम आता हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्राला विशेषतः मराठवाड्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे केले जात आहे. या मालिकेत जालना-नांदेड द्रुतगती मार्गासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीपकी 77 टक्के जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून 14 हजार 500 कोटींतून हे बांधकाम केले जाणार आहे. या मार्गासाठी लागणाऱ्या 2200 हेक्टर जमिनीचे संपादन चार महिन्यात पूर्ण करण्याचे MSRDC चे उद्दिष्ट आहे. जालना नांदेड या मार्गामुळे या दोन्ही शहरांतील 226 किलोमीटरचे अंतर 179.8 किलोमीटरपर्यंत येणार आहे.

जालना-नांदेड द्रुतगती मार्गाची वैशिष्ट्ये काय?

समृद्धी महामार्गाद्वारे जालना-नांदेड ही दोन शहरे जोडली जाणार आहेत. याद्वारे शहरांतील 226 किलोमीटरचे अंतर 179.8 किलोमीटर एवढे कमी होईल. तसेच मुंबई आणि नांदेड दरम्यानचा 12 तासांचा प्रवासही निम्म्यावर येणार आहे. परभणी, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांतून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे. प्रस्तावित जालना-नांदेड द्रुतगती मार्ग पुढे हैदराबादला जोडला जाणे अपेक्षित आहे. जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाची लांबी 179 किलोमीटर असून 87 गावांमधून हा मार्ग जाणार आहे. या 87 गावांपैकी 67 गावांमधील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार यांनी दिली. या मार्गाची वैशिट्ये पुढीलप्रमाणे- – संपूर्ण ग्रीनफिल्ड प्रकल्प असलेल्या या द्रुतगती मार्गासाठी एकूण 2200 हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. – बांधकामासाठी 14 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे. – या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन पुढील चार महिन्यात पूर्ण केले जाईल. – ऑक्टोबर 2024 पर्यंत हा द्रुतगती मार्ग बांधण्याचा एमएसआरडीसीचा संकल्प आहे. – जालना-नांदेड द्रुतगती मार्गामुळे जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे उर्वरीत महाराष्ट्राशी जोडले जातील.

2024 पर्यंत काम पूर्ण करणार

समृद्धी महामार्गातील विस्तारीत भाग असलेल्या प्रस्तावित जालना-नांदेड द्रुतगती मार्गासाठी एकूण 14 हजार 500 कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. जालना ते नांदेड या महामार्गादरम्यान परभणीतून 93 किलोमीटरचा पट्टा, जालना जिल्ह्यातून 66.46 किलोमीटरचा पट्टा तर नांदेड जिल्ह्यातून 19.82 किलोमीटरचा पट्टा जाईल.

इतर बातम्या-

Ajinkya Rahane IPL 2022 Auction: बॅडपॅचमध्ये असलेल्या अजिंक्यला घेण्यात KKR चे तीन मोठे फायदे, कसं ते समजून घ्या…

आघाडीच्या काळात अन्नदात्यावरही अन्याय, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लोकप्रतिनिधींचे साखळी उपोषण

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.